उर्जेबाबत सुला स्वयंपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:56 PM2017-08-04T14:56:41+5:302017-08-04T14:57:20+5:30

sula,winery,get,fulfill for enargy | उर्जेबाबत सुला स्वयंपूर्ण

उर्जेबाबत सुला स्वयंपूर्ण

Next


नाशिक- येथील सुला विनयार्डच्या वतीने शाश्वत पर्यावरणाच्या विविध उपक्रमांतर्गत सौर उर्जेचा वापर करून उर्जेबाबत स्वयंपूर्ण होण्याचा मान मिळवलो आहे. कंपनीने आधीच्या यंत्रणेलाच म्हणजेच गंगापूर व पिंपळगाव युनिट्स येथे सौर उर्जा उपक्र मात छतावर सौर फोटो व्होल्टेक यंत्रणा बसवण्याच्या महाराष्ट्र शासन आण िमहावितरण कंपनीच्या धोरणाअंतर्गत नाशिक विभागातील सुला विनयार्डसचा हा प्रकल्प नाशिकचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक क्षमतेचा प्रकल्प ठरला आहे.

सुलाने नेटमीटरचा वापर करून राबविवलेल्या अशा उपक्र मांमुळे महावितरणाची देखील विज बचत होईल. शिवाय ग्राहक स्वत:च्या जागेत वीजनिर्मिती करत असल्याने विद्युत वाहन करताना होणारी प्रचंड वीज घट देखील टळेल.आता सुला आपल्या स्वत:च्या वापरकरता आपल्या एकूण वापरापैकी पन्नास टक्के वीज स्वत: तयार करते. या नेटमिटरींग प्रकल्पामुळे कंपनीची विज बिलाचीआणखी १० ते १५ बचतहोऊ शकते असे सुलाच्या महाव्यवस्थापक(प्रकल्प) त्रंबक ओतूरकर यांनी सांगितले.थोड्याच कालावधीत सुलाचे संपूर्ण हॉस्पिॅटलिटी युनीटच शंभर टक्के अपारंपरिक उर्जास्त्रोतांवर चालवण्याचा मानस ओतूरकर यांनी व्यक्त केला.
सुरु वातीला जरी हि प्रणाली समजावून घेण्यास वेळ लागला, तरीही राज्य सरकार आणि स्थानिक महावितरण अधिकार्यांच्या प्रयत्नांमुळे व पुढाकार घेऊन केलेल्या मदतीमुळे आम्ही शाश्वत ऊर्जेकडे आणखी एक यशस्वी पाउल उचलू शकलो, असे डॉ. नीरज अग्रवाल यांनी सांगितले.
शेतीमालावर अवलंबून असलेल्या सुला विनयार्ड्स कडून सतरा लाख पन्नास हजार युनिट्स सौर उर्जेची निर्मिती केली जात आहे. यातून २४३० घरांना वर्षभर मिळेल इतकी वीजनिर्मिती होत आहे. सुलाच्या एकूण वीज वापरा पैकी पन्नास टक्के विजेची बचत या उपक्र मातून साधली जात आहे. इतरही कृषी जोडधंदे किंवा कृषी पूरक उद्योगांनी अशा उर्जेची निर्मिती करावी व बचत साधावी याकरता आदर्श ठेवला आहे.

 

 

Web Title: sula,winery,get,fulfill for enargy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.