बळीराजावर सुलतानी संकट

By Admin | Published: September 14, 2016 09:41 PM2016-09-14T21:41:44+5:302016-09-14T21:43:19+5:30

सोयाबीनवर लष्करी अळी : मक्यावर माव्याचा प्रादुर्भाव

Sultani crisis on the victims | बळीराजावर सुलतानी संकट

बळीराजावर सुलतानी संकट

googlenewsNext

  कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील कसबे व मौजे सुकेणेसह परिसरात सोयाबीन पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला, तर दुसरीकडे बागलाण तालुक्यातील खामखेडा व परिसरात मका पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कसबे व मौजे सुकेणे शिवारातील सोयाबीन पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेले असून, शासनाने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे व मौजे सुकेणे, ओणे या भागात सोयाबीन पिकावर लष्करी अळीने आक्रमण केले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगाच आल्या नसून ज्या ठिकाणी होत्या त्या शेतकऱ्यांची सोयाबीन लष्करी अळीच्या आक्रमणाला बळी पडली आहे. महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. या भागातील पिकांना पावसाची गरज असताना लष्करी अळीमुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मौजे सुकेणे येथील विलास गडाख, भिमसेन काळे, महेश चव्हाण, सचिन मोगल, रमेश मोगल, विश्वनाथ मोगल, राजेंद्र वामन मोगल, राजेंद्र मत्सागर आदि शेतकऱ्यांनी सोयाबीन नुकसानीची कैफियत मांडत शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Sultani crisis on the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.