मोहेगांवच्या सरपंचपदी सुमनबाई थेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 09:02 PM2021-03-01T21:02:12+5:302021-03-02T02:20:44+5:30
मनमाड : नांदगाव तालुक्यातील मोहेगांवच्या सरपंचपदी सुमनबाई देविदास थेटे तर उपसरपंचपदी शीतल ज्ञानेश्वर साळुंखे यांनी निवड करण्यात आली.
मनमाड : नांदगाव तालुक्यातील मोहेगांवच्या सरपंचपदी सुमनबाई देविदास थेटे तर उपसरपंचपदी शीतल ज्ञानेश्वर साळुंखे यांनी निवड करण्यात आली.
सरपंचपदासाठी सुमनबाई थेटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. गुप्त पद्धतीने घेतलेल्या मतदानात शीतल साळुंखे यांना पाच तर दत्तात्रय शिंदे यांना चार मते मिळाल्याने, शीतल साळुंखे यांची उपसरपंचपदासाठी निवड करण्यात आली.
साईश्रद्धा विकास पॅनलचे नेते माजी कृउबा संचालक अर्जुन शेळके, रमण हारदे, लीलाबाई हारदे, सुगंधाबाई गंधाक्षे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत विजयश्री खेचून आणली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ढवळे यांनी काम पाहिले. यावेळी तलाठी शिरसाठ उपस्थित होते.