उन्हामुळे भल्या पहाटे होत आहेत शेतीकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 07:52 PM2019-04-28T19:52:00+5:302019-04-28T19:52:52+5:30
जोरण - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयात गेल्या पंधरा दिवसापासुन सुर्य आग ओतु लागला असूने सकाळी ७ वाजताच उकाडा जाणवू लागला आहे.
जोरण - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयात गेल्या पंधरा दिवसापासुन सुर्य आग ओतु लागला असूने सकाळी ७ वाजताच उकाडा जाणवू लागला आहे.
परिसरात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे शरीराला थंडावा व थंडगार होण्यासाठी परिसरातील रसवंती व थंडपेय दुकानामध्ये गर्दी होत असून थंडपेयांची मागणी वाढत आहे.
शेतीकामासाठी शेतकरी वर्गाची शेतात जाण्यास व काम करण्याची इच्छाच होत नाही शेतकऱ्यांना शेतातील नांगरी आदी कामे पहाटेच्या वेळी कामे करावी लागत आहे तर काही तरी बचाव करु न शेती नांगरणी करावी लागत आहे. एका शेतकºयाने तर उन्हाचा बचाव करण्यासाठी चक्क ट्रॅक्टरचालविताना हेल्मेट वापरकरत आहे. शिवाय रस्त्यानेजाताना ट्रॅक्टर चालवत असतांना डांबर तापल्यामुळे उन्हाचे चटके बसत असल्यामुळे हेल्मेटचा वापर करीत आहे. हेल्मेट हे दुचाकी धारक वापरत होते परंतु उन्हापासून संरक्षणासाटी परिसरातील टॅक्टर चालकांनी हेल्मटला पसंती दिली आहे .