उन्हाळ कांदा संकटातकांदा भावात घसरण सुरूच

By admin | Published: October 25, 2016 10:45 PM2016-10-25T22:45:09+5:302016-10-25T22:55:18+5:30

शेतकऱ्यांमध्ये नाराजी : कांद्याची आवक वाढली;

Summer onion continues to fall in disaster | उन्हाळ कांदा संकटातकांदा भावात घसरण सुरूच

उन्हाळ कांदा संकटातकांदा भावात घसरण सुरूच

Next

येवला : गेल्या वर्षाच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यातून नवीन लाल कांद्याची आवक दहा पटीने वाढली असून, नाशिकसह काही भागातील शेतकऱ्यांनी एप्रिलपासून साठवून ठेवलेला कांदा आता नव्या कांद्याच्या तुलनेत चवीतदेखील फरक दाखवत असल्याने त्याची मागणी घटली आहे. त्यामुळे साठवण केलेला उन्हाळ कांदा संकटात सापडला असून, भाव मिळण्याची आशा तर सोडाच कांदा फेकण्याची वेळ आल्याने अशा परिस्थितीत शासनाने मदतीचा हात देण्याची अपेक्षा व्यक्त जात आहे.
कर्नाटक (बंगळुरू) या मार्केटला सध्या एक लाख क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. येथून संपूर्ण भारतात व परदेशात कांद्याची निर्यात होते. सध्या बंगळुरूला या नवीन लाल कांद्याला ८०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. या मालाचा दर्जा आणि प्रतवारीदेखील चांगली आहे. नाशिक परिसरातील उन्हाळ कांदा हा शेतकऱ्याने एप्रिलमध्ये साठवला आहे. सहा महिने साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला. जो कांदा शिल्लक राहिला त्याची गुणवत्ता काहीशी खराब झाली आहे. त्यामुळे लाल नवीन कांद्यापुढे साठवलेला उन्हाळ कांदा फिक्का पडत असल्याने त्याला व्यापारीपेठेत मागणी कमी झाली आहे. याशिवाय येवल्यासह नाशिक परिसरात १० ते १५ नोव्हेंबरपासून नवीन लाल कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होईल.
सध्या उन्हाळ कांद्याला भाव कमी असला तरी उत्पादन खर्चाच्या ४० टक्के रक्कम तरी मोठ्या जिकिरीने मिळत आहे. नुकसान होत असले तरी आता उन्हाळ कांदा मार्केटला आणून कांदा चाळीखाली करण्याशिवाय पर्याय नाही.
दीपावलीच्या कालावधीत २६ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत येवला कांदा मार्केट बंद असणार आहे. नोव्हेंबरमध्ये नवा कांदा बाजारात येईल आणि साठवण केलेल्या उन्हाळ कांद्याची कवडीमोल किंमत होईल या धास्तीने येवला कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक स्थिर असून, बाजारभाव मात्र घसरत आहे. यामुळे आताच कांद्याला भाव नाही तर नव्या पोळ लाल कांद्याला भाव कसा मिळणार, असा सवाल बाजार समितीच्या परिसरात कांदा उत्पादक शेतकरी विचारत आहेत.
कांद्याने शेतकऱ्याची पुरती निराशा केली आहे. वाहतूक खर्चदेखील फिटत नसल्याने हवालदिल झाला आहे. उन्हाळ कांदा साठवला तेव्हा १५०० ते २००० रु पये भाव मिळेल अशी अपेक्षा होती. कांदा बाजारभावाला लागलेली उतरती कळा आणि कांद्याचे ४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत वाईट दिवसाचा सामना करावा लागत आहे. गेल्या १५ दिवसांपासून दररोज कांद्याच्या बाजारभावात सारखा चढउतार चालू आहे.
शेतकऱ्याला शेतकामातून थोडी उसंत मिळाली की पुन्हा कांद्याची प्रचंड आवक होईल आणि पुन्हा कांदा भरडला जाण्याची चिन्हे गडद झाली आहे.
देशभरात विक्र मी कांदा उत्पादन असताना अतिरिक्त कांदा निर्यात करण्यासाठी शासनाने निश्चित पावले उचलावीत. निर्यात धोरणात कुचराई झाल्याने देशात मोठ्या
प्रमाणावर कांदा पडून आहे. याचा फटका कांदा भाव कोसळण्यावर होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Summer onion continues to fall in disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.