जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांदा लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 01:12 AM2021-03-24T01:12:13+5:302021-03-24T01:12:42+5:30
मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून यावर्षी तब्बल १ लाख ६६ हजार ५०३ हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली असून यात सटाणा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात ४६ हजार ९०२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे.
नाशिक : मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून यावर्षी तब्बल १ लाख ६६ हजार ५०३ हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली असून यात सटाणा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात ४६ हजार ९०२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे.
मागील वर्षी सुरुवातीला कांदा भावात थोडी घसरण झाली होती त्यानंतर मात्र अचानक उसळी घेत कांदा दर मोठ्या प्रमाणात वाढले
होते.
यावर्षीही कोरोना संकटा्च्या काळात कांद्याने शेतकऱ्यांना चांगला हात दिला असून उन्हाळ आणि लाल कांद्यालाही चांगला भाव मिळाला. सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उतरलेले असले तरी उन्हाळ कांद्याचा हंगाम सुरु होईपर्यंत दरांमध्ये बदल होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
कांद्यासाठी पाणी भरपुर लागत असल्याने ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे अशा बहुसंख्य शेतकऱ्यंनी कांदा लागवड केली आहे.
पाणी शेवटपर्यंत पुरावे यासाठी काहींनी थिबक आणि तुषार सिंचनाचाही वापर केला आहे. यावर्षी बियाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळाले नाही. ज्यांनी परजिल्ह्यातील बियाणे आणले अशा काही शेतकऱ्यांची बियाण्यात फसवणुकही झाल्याचे दिसुन येत असून बियाण्यातील भेसळीमुळे काही ठिकाणी कांद्याला डोंगळेच जास्त आले आहेत.