उन्हाळ कांदा सडला, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:15 PM2018-09-12T14:15:48+5:302018-09-12T14:16:27+5:30
जळगाव नेऊर : वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, कधी उत्पादन जास्त तर भाव कमी, तर कधी उत्पादन कमी तर भाव जास्त. सरकारचे धरसोड धोरण, बाजार पेठेतील असुरक्षित वातावरण, कोणत्याही अधिक उत्पादित मालाच्या निर्यातीच्या ठोस योजना नाही की भावाबाबत ठोस आश्वासन नसल्याने बºयाच वेळा शेतीमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकºयांच्या नशिबी आली आहे. एक रु पया खर्चून पंचविस पैसे कमवायचे अशी स्थिती शेतकºयांवर आली आहे. आँगस्ट महिन्यात सुरू असलेल्या रिमझिम पाऊस व गारव्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचा कांदा चाळीतच सडला आहे. सुरवातीला पोळ कांद्याला भाव असल्याने झालेल्या चार पैशातून मोठ्या प्रमाणात खर्च शेतकºयांनी उन्हाळ कांद्यावर केला. साधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून उन्हाळ कांद्याची रोपे टाकण्याची लगबग सुरु होते. म्हणजे रोपे टाकण्यापासुन एक वर्षाचा कालावधी उन्हाळ कांद्याला झालेला आहे. उन बेमोसमी पाऊस, गारा , खराब हवामान या संकटातून उन्हाळ कांद्याचे पिक वाचवुन साठवलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. आज मिळणा-या भावातून शेतकºयांचा खर्चही वसुल होत नसल्याने पर्यायाने मिळेल त्या भावात कांदा विक्र ी करावा लागत आहे.
********************
कांद्याचे उळे टाकण्यापासून आज वर्षाचा कालावधी संपत आलेला आहे पण सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे चाळीमध्ये साठविलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब होत असल्याने कवडीमोल भावाने विकणे अथवा उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालून कांदयांस किमान दोन हजार रूपये हमी भाव द्यावा व शेतक-यांना आधार द्यावा.
-केदारनाथ कुराडे, कांदा उत्पादक शेतकरी, जळगाव नेऊर