उन्हाळ कांदा काढणीस ‘कसमा’ पट्ट्यात सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:07 AM2020-04-20T00:07:29+5:302020-04-20T00:08:08+5:30

बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह कळवण, सटाणा, मालेगाव पसिरात तापमानाचा पारा ३५ ते ४० च्या आसपास गेल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे.

Summer onion harvesting begins in the 'Kasama' belt | उन्हाळ कांदा काढणीस ‘कसमा’ पट्ट्यात सुरु वात

वटार येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत कांदा काढणीत व्यस्त असलेले मजूर.

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचे पालन : शेतकऱ्यांना उन्हाच्या झळा; सरासरी उत्पन्नात ४० टक्के घट

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह कळवण, सटाणा, मालेगाव पसिरात तापमानाचा पारा ३५ ते ४० च्या आसपास गेल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे.
जिल्ह्यातील कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात सध्या उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. रोपांच्या टंचाईमुळे कांद्याच्या लागवडीत मोठी घट झाली असून, लागवड केलेला कांदादेखील काही ठिकाणी रोगामुळे निघू शकलेला नाही. त्यामुळे दरवर्षीच्या
तुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाउनमधून शेतकामांना सवलत दिल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळत तालुक्यात मजूरवर्ग तोंडाला
मास्क बांधून व उन्हाच्या झळा झेलत कांदा काढताना दिसत
आहेत. दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून, तापलेली जमीन व त्यातून निघणाºया तप्त झळा यामुळे शेतात काम करणाºया महिला व पुरुषांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तर काढणीस आलेले कांदा पीक उन्हाच्या चटक्याने करपू नये म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्या पाचटाचा वापर करताना दिसत आहेत. काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेचच चाळीत भरण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. उन्हाच्या चटक्याने शेतातील पिकेही पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहेत. दिवसभर काम करताना उन्हापासून रक्षणासाठी अंग झाकून घ्यावे लागत आहे. रक्षणासाठी मजूरवर्ग टोप्या-उपरण्याचा वापर करत असल्याचे दिसते आहे.

बाजारभाव नसल्याने साठवणुकीवर भर
कोरोनामुळे जिल्ह्यातील बारपेठा आज सुरू, चार दिवस बंद असल्यामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यातील शेतकºयांनी कांदा साठवणुकीवर भर दिला आहे. नगदी पीक असल्याने कांदा पिकाच्या बाजारभावावर शेतकºयांची आर्थिक गणिते अवलंबून असतात. कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते लागवड, खुरपणी, औषध फवारणी, काढणी, भरणी ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते. त्यात समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही तर भांडवलही सुटत नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली. कांद्याला हमीभाव मिळेल या अपेक्षेने अनेक शतकºयांनी साठवणुकीवर भर दिला आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याचे चिन्ह आहेत. ऐन जोमात असताना विविध रोगांनी कांदा पिकाला ग्रासले. परिणामी अर्धवट पीक तयार झाले. आर्थिक गणित बिघडले आहे. मजुरीचे दरही दुप्पट झाले आहे. मजुरांना मजुरी दिल्यानंतर आपल्या हातात काय राहणार, असा प्रश्न उपस्थित होतो.
- बळवंत दशपुते
कांदा उत्पादक, वटार

Web Title: Summer onion harvesting begins in the 'Kasama' belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.