पूर्व भागात उन्हाळ कांद्याची काढणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:46 AM2019-04-01T00:46:35+5:302019-04-01T00:46:52+5:30

नाशिक तालुक्यातील पूर्व भागात उन्हाळ कांदा काढण्याच्या कामास वेग आला असून, शेतकऱ्यांनी काढलेल्या कांद्याची साठवणूक करण्यात सुरुवात केली आहे.

Summer onion harvesting in the East | पूर्व भागात उन्हाळ कांद्याची काढणी

पूर्व भागात उन्हाळ कांद्याची काढणी

Next

एकलहरे : नाशिक तालुक्यातील पूर्व भागात उन्हाळ कांदा काढण्याच्या कामास वेग आला असून, शेतकऱ्यांनी काढलेल्या कांद्याची साठवणूक करण्यात सुरुवात केली आहे.  उन्हाळ कांद्याची लागवड डिसेंबर ते जानेवारी महिन्यात केली जाते. साधारणत: हा कांदा मार्चअखेर व एप्रिलमध्ये काढला जातो. एकलहरे परिसरात काही शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा काढून झाला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या शेतात कांदा काढण्याचे काम सुरू आहे.
मजुरांकडून कांदा उपटून, खांडून, ट्रॅक्टरमध्ये भरून चाळीमध्ये साठवणूक करण्यासाठी नेला जात आहे. आर्थिक गरजेमुळे काही शेतकरी आपला कांदा लगेच मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत. नाशिक तालुका पूर्व भागात मजुरांची वानवा असल्याने ठेकेदारी पद्धतीने मजुरांकडून कांदा काढण्याचे काम केले जात आहे. सध्या लग्नसराई असल्याने अनेक शेतकºयांना मुला-मुलींच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता असल्याने शेतकºयांनी हा कांदा नाशिक बाजार समितीच्या सिन्नरफाटा उपबाजार, पेठरोडवरील मुख्य बाजार आवार, पिंपळगाव बसवंत, लासलगाव, सायखेडा येथील मार्केटमध्ये आपापल्या सोईने विक्रीसाठी नेण्यास सुरुवात केली आहे.
लागवडीची धावपळ
एकलहरे परिसरातील शेतकरी बारमाही पाण्याची सोय असल्याने कायम भाजीपाला पिकवित असतात. सध्या कोबी, फ्लॉवर, करडई असा भाजीपाला लागवड करण्यासाठी रोपे तयार करून ठिकठिकाणी भाजीपाला लागवडीसाठी लगबग सुरू आहे. काही ठिकाणी कोबीच्या लागवडीनंतर बुरशीनाशक फवारणी सुरू आहे. नवीन कोबीची लागवड करण्यासाठी सºया तयार करून रोपांची लागवड केली जात आहे.

Web Title: Summer onion harvesting in the East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.