उमराणेत उन्हाळी कांद्याची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 05:38 PM2019-05-02T17:38:21+5:302019-05-02T17:42:02+5:30
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी ( गावठी ) कांद्याच्या आवकेत प्रचंड वाढ झाली आहे. आवकेत वाढ असतांनाही स्थानिक व्यापार्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीवर भर दिल्याने बाजारभाव तेजीत आहेत.
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी ( गावठी ) कांद्याच्या आवकेत प्रचंड वाढ झाली आहे. आवकेत वाढ असतांनाही स्थानिक व्यापार्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीवर भर दिल्याने बाजारभाव तेजीत आहेत. चालुवर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने उन्हाळी काद्यांचे उत्पादन घटेल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. परंतु दुष्काळी परिस्थितीचा फायदा घेत पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करून भरमसाठ उत्पादन घेतले आहे.परिणामी स्वत:च्या कांदाचाळी भरु न उर्विरत शिल्लक असलेला कांदा व जळगाव, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यातुनही कांदा विक्र ीस येत असल्याने येथील बाजारात समतिीत मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. तर याऊलट चालुवर्षी पावसाअभावी उमराणेसह परिसरात उन्हाळी कांद्याची लागवड झाली नसल्याने जवळजवळ सर्वच शेतकर्यांच्या कांदा चाळी रिकाम्या आहेत. परिणामी आगामी काळात कांद्याचे बाजारभाव वाढतील या अपेक्षेने स्थानिक व्यापार्यांसह सदन शेतकर्यांनी बाजारात विक्र ीस आलेला कांदा खरेदी करु न चाळींमध्ये साठवणुकीवर भर दिल्याने बाजारभाव तेजीत आहेत. दरम्यान बाजार समतिी आवारात गुरु वार ( दि. २ ) रोजी सुमारे ९०० टॅक्ट्रर व ३०० पिकअप वाहनांमधुन अंदाजे पंचवीस हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव कमीतकमी ३५१ रु पये, जास्तीत जास्त ११५० रु पये, तर सरासरी ७०० रु पयांपर्यंत होते.