उन्हाळी कांद्याना कोमटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 06:22 PM2019-01-10T18:22:38+5:302019-01-10T18:24:11+5:30
नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याने यावर्षी पुरता वांदा केला असुन गेल्या महिन्याभरापासून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने तब्बल दहा महिन्यांपासून चाळीत साठवणुक केलेल्या कांद्याना कोमटे फुटल्याने निम्म्याहुन अधिक कांदे उकीरड्यावर फेकुन देण्याची वेळ आली आहे.
उमराणे : नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याने यावर्षी पुरता वांदा केला असुन गेल्या महिन्याभरापासून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने तब्बल दहा महिन्यांपासून चाळीत साठवणुक केलेल्या कांद्याना कोमटे फुटल्याने निम्म्याहुन अधिक कांदे उकीरड्यावर फेकुन देण्याची वेळ आली आहे.
गेल्या दोन ते तिन महिन्यांपासुन भाववाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या उन्हाळी कांद्याचे दर दिवसेंदिवस कमी कमी होत असताना कांदा उत्पादक शेतकºयांना वातावरणातील बदलामुळे अजुन एक समस्येने ग्रासले असुन साठवणुक केलेल्या कांद्याना थंडीमुळे कोमटे फुटल्याने निम्म्याहुन अधिक कांदा उकीरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे.
सद्यस्थितीत उन्हाळी कांद्याना मिळत असलेला कवडीमोल भाव व वातावरणातील बदलामुळे कांद्याना कोमटे फुटल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
रवानगी थेट उकीरड्यावर
उन्हाळी कांदा चाळीत जास्त दिवस टिकावा व सडु नये यासाठी चाळीत कांदे भरतेवेळी विविध प्रकारची सल्फर पावडर टाकली जाते. त्यामुळे कोमटे फुटलेल्या व खराब झालेल्या कांद्यांना शेळया मेंढ्याही खात नाही. त्यामुळे त्यांची रवानगी थेट उकीरड्यावर होत आहे.