जोरण परिसरातील उन्हाळ कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 04:27 PM2018-09-14T16:27:54+5:302018-09-14T16:28:38+5:30

जोरण - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयातील जोरण,किकवारी खु,किकवारी बु,तळवाडे दिगर,कंधाणे,आदि परिसरात उन्हाळ कांदा खराब होत आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या कष्टातुन खर्चही निघत नसल्याने भाववाढ होईल या आशेवर शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यापासुन चाळीत साठलवेला कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे

 Summer onion losses in the zone | जोरण परिसरातील उन्हाळ कांद्याचे नुकसान

जोरण परिसरातील उन्हाळ कांद्याचे नुकसान

Next
ठळक मुद्देबहूतांश उच्च शिक्षित हे शेती व्यावसाय कडे आले मात्र शिक्षण करु न नोकरी नाही ,शेती करु न शेती मालाला भाव नसल्याने ईकडे आड ,तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे .



जोरण - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयातील जोरण,किकवारी खु,किकवारी बु,तळवाडे दिगर,कंधाणे,आदि परिसरात उन्हाळ कांदा खराब होत आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या कष्टातुन खर्चही निघत नसल्याने भाववाढ होईल या आशेवर शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यापासुन चाळीत साठलवेला कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

जुलै,आॅगस्ट म हिन्यात सुरु असलेल्या रिमझिम पाऊस व गारव्याने परिसरातील गारव्याने शेतकºयांचा ऊन्हाळी कांदा हा चाळीत सडला आहे .थोड्या फार प्रमात रहीलेला आहे त्याला भाव नाही सप्टेबर महिन्याअखेर उन्हाळ कांद्याची रोपे टाकण्याची लगभग सुरु होते. म्हणजे रोपे टाकण्यापासुन एक वर्षाचा कालावधी उन्हाळ कांद्याला झालेला आहे ऊन,बेमोसमी पाऊस ,गारा,खराब हवामान वाढती मजुरी,महागडी औषधे फवारणीसाठी,खत,खाद्य,महागडी बियातणे, या संकटाना सामोरे जावून शेती करावी लागत आहे.लाखो रु पये खर्च केलेले कांदा हा चाळीत सडत आहे परिसरातील शेतकरी हे चिंतेत पडले आहेत.

Web Title:  Summer onion losses in the zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.