उन्हाळ कांद्याचा आता बसेना मेळ, भाव वाढताच निर्यातबंदीचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:28 PM2020-09-16T17:28:39+5:302020-09-16T17:29:29+5:30
जळगाव नेऊर : कोरोना संकटकाळात उन्हाळं कांद्याला लागलेली साडेसाती शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही, सहा महिन्यापासून भाववाढीच्या आशेने चाळीत साठवलेला कांदा सडलेला असताना उरलेला कांद्याला भाव वाढून चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे.
जळगाव नेऊर : कोरोना संकटकाळात उन्हाळं कांद्याला लागलेली साडेसाती शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही, सहा महिन्यापासून भाववाढीच्या आशेने चाळीत साठवलेला कांदा सडलेला असताना उरलेला कांद्याला भाव वाढून चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे. सन २०१९-२० वर्षात इतर राज्यात झालेल्या पावसाने त्या राज्यातील कांदा सडल्याने महाराष्ट्रातील बळीराजाच्या लाल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला, आणि चार पैसे पदरात पडले पण अतिवृष्टीने उन्हाळ कांद्याची रोपे सडुन गेली होती, म्हणून सोन्याच्या भावात रोपे खरेदी करून उन्हाळ कांदा लागवड केल्या, पण मागील वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे दव आणि धुके, तर कधी पाऊस तर कधी उष्ण दमट वातावरण राहिल्याने त्याचा परिणाम उन्हाळ कांद्यावर झाला. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात औषधे फवारणी करु न कांदा वाचवला.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा सडण्याचे प्रमाण अधिक आहे ,तसेच अनेक शेतकर्यांनी कोरोना संसर्ग साथीमुळे भाव वाढतात कि नाही यामुळे आहे त्या भावात कांदा विकला. जून महिन्यात केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल करु न त्यामधून कांदा वगळण्यात आला होता. त्यानंतर देशांतर्गत व विदेशात कांद्याला चांगला दर मिळत असल्याने बळीराजाच्या चेहºयावर समाधानी भाव उमटताना दिसत होते. खिशात चांगले पैसे जमा होत असल्याच्या या त्यांच्या आनंदावर निर्यातबंदी निर्णयाने विरजण पडले आहे.
शेतकºयांचा कांदा पन्नास साठ टक्के चाळीतच सडल्याने उकिरड्यावर फेकावा लागला, उरलेल्या कांद्यातुन चार पैसे पदरात पडतील अशी अशा होती, मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे. त्यामुळे यापुढे शेतकरºयांनी कांदा साठवणूक करावी कि नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- केदारनाथ कुराडे,जळगाव नेऊर.