ऊन्हाळ कांदा आवकेत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 05:14 PM2018-10-20T17:14:40+5:302018-10-20T17:14:57+5:30
येवला : येवला व अंदरसुल कांदा बाजार आवारात ऊन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात थोडीशी घसरण झाल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात मागणी चांगली होती. सप्ताहात एकुण कांदा आवक २६००१ क्विंटल झाली असुन ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते२७०० रुपये तर सरासरी १८५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक १६२०४ क्विंटल झाली असून ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते २७०० रुपये तर सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.

सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हाची एकुण आवक १२ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १८०० ते कमाल २१५० रुपये तर सरासरी १८७५ पर्यंत होते. बाजरीची एकुण आवक ३४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १२०० ते कमाल १७०० तर सरासरी १५०१ पर्यंत होते.
हरभऱ्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात हरभºयाची एकुण आवक २१ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३००० रुपये ते कमाल ३९०० तर सरासरी ३६०० रुपयांपर्यंत होते. मुगाची एकुण आवक ५८ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ३००० ते कमाल ५४०१ तर सरासरी ४७०० रुपयांपर्यंत होते.
सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात सोयबीनची एकुण आवक १०३४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३००० ते कमाल ३२३९ रुपये, तर सरासरी ३१५० रुपयांपर्यंत होते.
सप्ताहात मकाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. मक्याची एकुण आवक ९१५० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १२०० ते कमाल १४२२ तर सरासरी १३४० प्रति क्विंटल पर्यंत होते.