उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 01:21 PM2019-11-29T13:21:52+5:302019-11-29T13:21:59+5:30
वणी : येथील उपबाजार आवारात शुक्रवारी उन्हाळ कांद्याची आवक लाल कांद्यापेक्षा कमी झाली आहे. उन्हाळ कांदा जवळपास साठवणुकीच्या अंतिम ...
वणी : येथील उपबाजार आवारात शुक्रवारी उन्हाळ कांद्याची आवक लाल कांद्यापेक्षा कमी झाली आहे. उन्हाळ कांदा जवळपास साठवणुकीच्या अंतिम टप्यात असल्याने लाल कांदा बाजारपेठा काबीज करेल असे चित्र दिसते आहे. आठवडाभरापुर्वी आठ हजाराच्या पुढे टप्पा ओलांडलेला उन्हाळ कांदा आजमितीस ५६०० रु पयांवर आला आहे. वणी उपबाजारात आज १०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. कमाल ६६०१ किमान ५६०० तर सरासरी ६१०० अशा दराने खरेदी विक्र ी व्यवहार पुर्ण करण्यात आल. १५ वाहनामधुन १२५ क्विंटल लाल कांदा उत्पादकांनी विक्र ीसाठी आणला होता. कमाल ५५००, किमान ३३०० तर सरासरी ४९५० रु पये प्रती क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला आहे. लाल कांदा हा उन्हाळच्या तुलनेत टिकाऊ नसला तरी उन्हाळ कांद्याला पर्याय निर्माण झाला आहे. उन्हाळ कांदाही जवळपास संपल्यात जमा आहे तरी सध्या आठवडाभरापुर्वी असलेली कांदा दरातील तेजीचे वातावरण आहे.