उन्हाळं कांदा उत्पादनात घट येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 05:39 PM2020-02-03T17:39:22+5:302020-02-03T17:41:43+5:30
जळगाव नेऊर : सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने ढगाळ वातावरण, दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने आक्र मण केल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात किटकनाशके, बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली असून कांदा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे.
लोकमत न्युज नेटवर्क

सध्या उन्हाळं कांदा लागवड अंतिम टप्प्यात आहे. जळगाव नेऊर परिसरात गेली तीन महिन्यापासून ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी तर कधी दररोज पडणारे दव आणि धुके यामुळे कांदा जमिनीतच बारीक होत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना भरपूर प्रमाणात पिकांवर फवारणी करुनही दुषीत वातावरण हटायला तयार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
अगोदरच लाल कांद्यातून पाहिजे असे उत्पादन खराब हवामानामुळे मिळाले नसल्याने आता उन्हाळ कांद्यालाही अधिक प्रमाणात औषधांची फवारणी करावी लागत असल्याने तसेच कांदा बाजार भावात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
परतीच्या पावसापासून शेतकºयांची सुरू झालेली साडेसाती पाठ सोडायला तयार नसून आठ-पंधरा दिवसातुन खराब होणाºया वातावरणामुळे कांदा उत्पादनात घट येत आहे.
पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर विक्र मी कांदा लागवड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी फवारणी केल्यामुळे कांदा नाळपठ होत असल्याने तसेच थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागल्याने कांदा उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माझ्या दोन एकर शेतात उन्हाळं कांदे लावल्यापासुन कांद्याला औषधे सुरू आहेत, ढगाळ वातावरणामुळे व धुक्यामुळे कांदा पिकाला करपा, मावा पडल्याने कांदा पिक मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. त्यावर भरपूर खर्च होऊन ही पाहिजे असे उत्पादन निघणार नाही याची आता भिती वाटू लागली आहे.
- विकास गायकवाड, कांदा उत्पादक, जळगाव नेऊर.