यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:38 PM2020-04-08T23:38:46+5:302020-04-08T23:39:01+5:30

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात शेवटच्या टप्प्यातील सर्व उन्हाळ कांदा लागवड करपा रोगाच्या प्रादुर्भावाने पूर्णपणे बाधित झाली आहे. ...

Summer onion production will decline this year | यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार

यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार

Next
ठळक मुद्देकरपा रोगाचा प्रादुर्भाव : बळीराजा हवालदिल

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात शेवटच्या टप्प्यातील सर्व उन्हाळ कांदा लागवड करपा रोगाच्या प्रादुर्भावाने पूर्णपणे बाधित झाली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ कांदा उत्पादनात मोठी घट दिसून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परिसरात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे शेती डिसेंबर अखेरपर्यंत ओलिताखाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीची तीन ते चार वेळेस आंतरमशागत करून अतिपाववसाने बाधित झालेली शेती लागवडीखाली आणली. त्यात उन्हाळ कांद्याची लागवड केली. यंदा परिसरात झालेली कांदा लागवड टप्प्याटप्प्याने
झाली असून, पहिल्या व दुसºया टप्प्यातील कांद्याची लागवड झाली ती आज काढणी सुरु आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी निघाले आहे. यात बहुतेक शेतकरी हा कांदा विक्री करत आहे तर काही शेतकरी कांदाचाळीत साठवत आहे. तिसºया टप्प्यातील कांदा लागवड ही करपा रोगाला बळी पडली असून तो कांदा परिपक्व नसल्याने तो चाळीत साठविता येणार नाही. त्यामुळे यंदा तरी परिसरात कांदा उत्पादन घटले असून चाळीत साठवणूकदेखील कमी प्रमाणात होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खर्च गेला वाया
यंदा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेती उपळून निघाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाचे केलेले मका पीक वाया गेले. त्यानंतर शेतीत डिसेंबर अखेरपर्यंत पाणी होते. शेतकºयांनी शेतजमीन तीन ते चार वेळेस आंतरमशागत करून शेती उन्हाळ कांद्याच्या लागवडीयोग्य बनवली व त्यात उन्हाळ कांदा लागवड केली. ही लागवड शेवटच्या टप्प्यातील असून, लागवड केलेल्या कांद्याला शेतकरी बांधवांनी मोठे आर्थिक भाग भांडवल लावले. कांदा कुठल्याही रोगाला बळी पडू नये यासाठी रोगप्रतिबंधक फवारण्याही केल्या, परंतु गेल्या दहा दिवसांपासून परिसरात उन्हाचा तडाखा वाढल्याने ही तिसºया टप्प्यातील व उपळट झालेल्या शेतात केलेली सर्व कांदा लागवड करपा रोगाला बळी पडली असून, शेतकºयांचा सर्व खर्च वाया गेला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.

शेतकºयांचे अतोनात नुकसान झाल्याने कृषी विभागाकडून या सर्व शेताची पाहणी करून शासनाकडे याबाबत अहवाल पाठवावा. ज्या शेतकºयांचा खरीप व रब्बीही वाया गेला असा शेतकरी सावरावा यासाठी आर्थिक मदत मिळावी.
- दादाजी रेवबा जाधव, शेतकरी, पिळकोस

कांदा पीक वाचविण्यासाठी टॅँकरने पाणी
सायगाव : गावासह परिसरात विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी या भागातील शेतकरी २५ हजार लिटर क्षमतेचे पाणी टँकर तीन हजार रुपये दराने विकत घेत आहेत. यंदा चांगला पाऊस पडला. येवला तालुक्यात किमान रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे पीक हमखास निघेल या आशेवर मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली. पण, फेब्रुवारी महिन्यातच नदी-नाले, छोटे-मोठे बंधारे कोरडेठाक झाले. मार्चच्या शेवटी तर गाव परिसरातील विहिरींनीही तळ गाठला. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. मशागत, महागड्या दराचे कांदा रोप, लागवड, रासायनिक खते यामुळे कांदा पीक उभे करण्यासाठी एकरी ४० हजार रुपये खर्च झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी या भागात शेतकरी टँकरने पाणी विकत घेऊन पिकांना देत आहे. एकरभर कांद्याला एक पाणी द्यायचे म्हटल्यावर चार टँकर लागतात. विकतच्या पाण्यामुळे कांदा उत्पादन खर्चात २० हजार रुपयांची वाढ होणार आहे. सध्या उन्हाळ कांद्याच्या बाजारभावाची घसरण बघता कांदा उत्पादकांच्या हाती शिल्लक नफा राहणार नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Summer onion production will decline this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.