उन्हाळी कांद्याची काढणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 04:08 PM2019-03-27T16:08:52+5:302019-03-27T16:08:58+5:30

वटार : जिल्ह्यातील कांद्याचे अगार असलेल्या कळवण,सटाणा,मालेगाव,देवळा तालुक्यात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरु असून,चालू दुष्काळामुळे कांद्याच्या लागवडीत मोठी घट झाली आहे.

 Summer onion started | उन्हाळी कांद्याची काढणी सुरु

उन्हाळी कांद्याची काढणी सुरु

Next
ठळक मुद्देलागवड केलेला कांदा देखील काही ठिकाणी पाण्याअभावी निघू शकलेला नाही त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट होण्याचा अंदाज शेतकरी करत आहे.एकीकडे नागरिकांना उन्हामुळे घराच्या बाहेर न निघण्याचे सागितले जातेय तर दुसरीकडे कांदा उत्पादक शे


वटार : जिल्ह्यातील कांद्याचे अगार असलेल्या कळवण,सटाणा,मालेगाव,देवळा तालुक्यात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरु असून,चालू दुष्काळामुळे कांद्याच्या लागवडीत मोठी घट झाली आहे.
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयात तपमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाचा पारा चढल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.कडक उन्हाच्या झळा अंगावर लाही-लाही होत असतानाही बागलाण तालुक्यात कांदा काढणीच्या कामे चालू आहेत. रणरणत्या उन्हाचा चटका गेला दहा-बरा दिवसापासून चांगलाच जाणवत असून,रात्रीच्या वेळेस थंडी,दिवसा कडक उन्हाचा चटका या वातावरणातील उकाडा चांगलाच जाणवत आहे.
दुपारच्या वेळेस कडक उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून,तापलेली जमीन व त्यातून निघणाऱ्या तप्त झळा शेतात काम करणाऱ्यामहिला व पुरु षाच्या अंगावर चांगलेच चटके देऊन जात आहेत.काढणीस आलेले कांदा पिक उन्हाच्या चटकक्याने भाजू न्हाये म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्यापाचटाचा वापर करीत असताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेचच चाळीत भरण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे चित्र दिसत आहे.
उन्हाच्या चटक्याने शेतातील पिके हि पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहेत,दिवसभर काम करताना स्वसंरक्षणासाठी अंग झाकून घ्यावे लागत आहे.म्हणून संरक्षणासाठी मजूर वर्ग टोप्या उपरण्याचा वापर करीत आहेत.

Web Title:  Summer onion started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.