ऐन उन्हाळ्यात शेवखंडीला अवतरली गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2016 10:43 PM2016-05-30T22:43:44+5:302016-05-30T22:58:02+5:30

लोकार्पण : आयएमए व सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून जलप्रकल्प

In the summer of summer, the river Ganga | ऐन उन्हाळ्यात शेवखंडीला अवतरली गंगा

ऐन उन्हाळ्यात शेवखंडीला अवतरली गंगा

Next

पेठ : मे महिन्याच्या तळपत्या उन्हात डोक्यावर रिकामे हंडे घेऊन घोटभर पाण्यासाठी रानोमाळ वणवण भटकणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर गावात तेही आपल्या घरासमोरच्या नळाला पाणी आल्याचे पाहून झालेला आनंद हा भगीरथाने पृथ्वीवर गंगा अवतरल्यागत असल्याचा अनुभव पेठ तालुक्यातील शेवखंडी, खोटरेपाडा व फणसपाडा येथील जलप्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात पहावयास मिळाला़
शेवखंडी हे पेठ तालुक्यातील अतिदुर्गम गाव गत पाच-दहा वर्षापासून या गावाला पाणीटंचाईचे ग्रहण लागलेले सुटता सुटत नव्हते़. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजना राबवून गावाचा पाणीप्रश्न सोडवण्याचा केलेला प्रयत्नही निष्पळ ठरल्याने गावकऱ्यांच्या नशिबी पाणीटंचाई पाचवीला पूजलेली तशीच राहिली़ गावाच्या दूरवर नदीकाठी मुबलक पाणी असताना गावाला दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणण्याची वेळ आल्याने या गावातील अनेक कुटुंबांनी पाणीटंचाईला कंटाळून इतरत्र स्थलांतरही केले़
मात्र सोशल नेटवर्किंग फोरम व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या माध्यमातून शेवखंडी व तीन पाड्यांचा पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले़ आणि केवळ दोन महिन्याच्या कालावधीत शेवखंडी गावात पाणी आले़ आयएमए व सोशल नेटवर्किंग फोरमने आर्थिक भार उचलला तर गावातील नागरिकांनी श्रमदान करून जवळपास अडीच किमी अंतरावरून पाइपलाइनच्या साह्याने गावाला मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला़
लोकार्पण सोहळा संपन्न
शेवखंडीसह खोटरेपाडा व फणसपाडा येथील या अभिनव पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा आयएमएचे अध्यक्ष डॉ़ अनिरुद्ध भांडारकर, सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते गावातील महिलांच्या उपस्थितीत करण्यात आला़
यावेळी आयएमएचे सचिव डॉ़ प्रशांत देवरे, डॉ़पंकज भदाणे, डॉ़ जयदीप निकम, प्रशांत बच्छाव, पेठचे माजी सभापती मनोहर चौधरी आदिंच्या उपस्थितीत संपन्न झाला़ प्रमोद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले़ डॉ़ अनिरुद्ध भांडारकर यांनी यापुढील काळातही पेठसारख्या आदिवासी व अतिदुर्गम तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला़
याप्रसंगी डॉ़ नीलेश निकम, डॉ़ समीर पवार, डॉ़ वैभव पाटील, डॉ़ समीर चंद्रात्रे, डॉ़ योगेश जोशी, डॉ़ रविराज खैरनार, डॉ़ कोठारी, अमोद पाटील, माणिक सोनवणे, पोलीसपाटील पांडुरंग चौधरी, गणपत गावित, अंबादास भुसारे, ग्रामसेवक होळकर, शिक्षक महाले, चौधरी यांच्यासह शेवखंडी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ फोरमचे समन्वयक रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन तर प्रशांत बच्छाव यांनी आभार मानले़ (वार्ताहर)

Web Title: In the summer of summer, the river Ganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.