उन्हाळी टमाट्याच्या फुटवे बांधणीच्या कामास वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:29 AM2019-04-09T00:29:41+5:302019-04-09T00:30:00+5:30
परिसरात उन्हाळी टमाट्याच्या फुटवे बांधणीच्या कामास वेग आला आहे. टमाट्याच्या झाडास फांद्या फुटू लागल्या की त्या जमिनीवर पसरण्याच्या आत सुतळी किंंवा पाढऱ्या नायलॉनच्या धाग्याने बांधून तारेला आधार दिला जातो.
एकलहरे : परिसरात उन्हाळी टमाट्याच्या फुटवे बांधणीच्या कामास वेग आला आहे. टमाट्याच्या झाडास फांद्या फुटू लागल्या की त्या जमिनीवर पसरण्याच्या आत सुतळी किंंवा पाढऱ्या नायलॉनच्या धाग्याने बांधून तारेला आधार दिला जातो.
एकलहरे परिसरात सद्या अनेक उन्हाळी शेती कामांची लगबग सुरू आहे. गहू, कांदे काढून ठिकठिकाणी पुढच्या पिकांसाठी शेत नांगरून खते पसरण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कांदे काढून झाल्यावर लगेचच कोंंबडीखत पसरून, ट्रॅक्टरने नांगरून, वखरून सऱ्या व वाफे तयार करून पुढच्या पिकांची तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी कोबी, फ्लॉवर लागवड सुरू आहे. एकलहरे परिसरात अनेक ठिकाणी फेब्रुवारीत लागवड केलेल्या टमाट्याला फुटवा फुटून, फुल-कळीचा बहर आला आहे. साधारण पाच ते सहा फूट उंचीचे बारीक बांबू रोऊन त्यांना तारा ओढून बांधल्या जातात. ४५ दिवसांत फुटवा फुटल्यावर सुतळी अथवा पांढºया नायलॉनच्या धाग्याने फुटव्याच्या फांद्या बांधून तारेला अडकवल्या जातात. त्यामुळे जमिनीवर न पसरता फुटव्याच्या फांद्यांना फूल कळी मोठ्या प्रमाणात लागते. उन्हाळ्याचा सिझन असल्याने सुतळी जास्त काळ टिकत नाही, म्हणून शेतकरी नायलॉनचा पांढरा धागा वापरतात. सद्या फुटवे बांधलेल्या काड्यांना पिवळीधमक फुले व हिरव्यागार कळ्या लगडलेल्या दिसतात. साधारण ५० दिवसांत ही प्रक्रि या पूर्ण झाल्यावर पोषक औषधांची फवारणी केली जाते.
चांगला भाव मिळण्याची आशा
सध्या मार्केटमध्ये टमाटे २० किलोच्या १ क्रेटसाठी ६०० रु पये दराप्रमाणे विकले जातात. आता फूलकळीवर आलेला टमाटा अजून २० दिवसांनी म्हणजे एप्रिलअखेरपर्यंत खुडून ऐन उन्हाळ्यात बाजारात येईल. उन्हाळी टमाट्याची लागवड कमी प्रमाणात असल्याने एप्रिल व मेमध्ये चांगला भाव मिळेल, असे जाणकार शेतकरी सांगतात.