कळमकर बंधाऱ्यातून गाळ उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:59 PM2019-01-30T12:59:56+5:302019-01-30T13:00:06+5:30
येवला : तालुक्यातील उंदिरवाडी येथे जलसमृद्धीतून विकास,गाळ मूक्त धरण व गाळ मुक्त शिवार या योजने अंतर्गत कळमकर बंधारर्याचा गाळ उपसा करण्याच्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
येवला : तालुक्यातील उंदिरवाडी येथे जलसमृद्धीतून विकास,गाळ मूक्त धरण व गाळ मुक्त शिवार या योजने अंतर्गत कळमकर बंधारर्याचा गाळ उपसा करण्याच्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गाळ काढण्याच्या कामाची सुरु वात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रांताधिकारी भीमराज दराडे,तहसीलदार रोहिदास वारु ळे, गटविकास अधिकारी अन्सार शेख ,लघु पाटबंधारे अभियंता पवार, ३८ गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. योजनेचे अधिकारी अजित भोर, मंगेश बोपचे,धनंजय देशमुख, भालचंद्र राऊत,आकाश कदम, सलमान नदाफ, प्रितम लोणारे, दिपाली वाघ यांनी योजनेची माहितीसह व युवा मित्र ही संस्था कशापद्धतीने काम करत आहे याची माहिती दिली.विशेष म्हणजे या योजनेद्वारे पोकलेंन मशीन टाटा कंपनीने उपलब्ध करून दिले असून इंधनाचा खर्च शासन करणार आहे.उपसा केलेला गाळ घेऊन जाण्याची जबाबदारी ही लाभार्थी शेतकºयाची असणार आहे.
सदर प्रसंगी प्राताधिकारी भीमराज दराडे ,तहसीलदार रोहिदास वारु ळे यांनी योजनेतून गावाला व शेतकºयांना होणा-या फायद्याची जाणीव करून दिली.