रविवार ठरला ‘अग्नि’वार; तरुण होरपळून ठार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 01:26 AM2022-06-20T01:26:20+5:302022-06-20T01:27:22+5:30

शहरासाठी रविवार (दि.१९) हा ‘अग्नि’वार ठरला. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हॅप्पी होम कॉलनीमध्ये रो-हाऊसमध्ये आगीचा भडका उडाला. त्यापाठोपाठ मास्टर मॉलमध्येही आग भडकली. दोन्ही ठिकाणी लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. रो-हाऊसमध्ये लागलेल्या आगीत युवकाचा होरपळून मृत्यू झाला. मॉलमध्ये दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू असलेल्या आगीच्या तांडवामध्ये इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून राख झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.

Sunday became the ‘Fire’ War; Young Horplu kills! | रविवार ठरला ‘अग्नि’वार; तरुण होरपळून ठार !

हॅप्पी होम कॉलनीत याच रो-हाऊसमध्ये आगीचा भडका उडाला होता. यावेळी नागरिकांची झालेली गर्दी.

Next
ठळक मुद्देअग्नितांडव : रो-हाऊस अन् मास्टर मॉलमध्ये धुमसली आग

नाशिक : शहरासाठी रविवार (दि.१९) हा ‘अग्नि’वार ठरला. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हॅप्पी होम कॉलनीमध्ये रो-हाऊसमध्ये आगीचा भडका उडाला. त्यापाठोपाठ मास्टर मॉलमध्येही आग भडकली. दोन्ही ठिकाणी लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. रो-हाऊसमध्ये लागलेल्या आगीत युवकाचा होरपळून मृत्यू झाला. मॉलमध्ये दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू असलेल्या आगीच्या तांडवामध्ये इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून राख झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.

पुणे महामार्गावरील बजरंगवाडीशेजारी असलेल्या हॅप्पी होम कॉलनीत राजगृह नावाचे उत्तम काळखैरे यांचे एक मजली राे-हाऊस आहे. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानकपणे त्यांच्या घरावरील बेडरूममध्ये धुराचे लोट उठले आणि यावेळी घरात असलेला त्यांचा तरुण मुलगा मयूर काळखैरे (३१) हादेखील आगीपासून स्वत:ला वाचविण्यासाठी ओरडू लागला. आजूबाजूच्या रहिवाशांनी व त्यांनी वरच्या मजल्यावर धाव घेत बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र दरवाजा आतून बंद असल्याने काहीही केल्याने उघडणे शक्य नव्हते. जागरूक नागरिकांनी त्वरित ‘डायल-११२’हेल्पलाइनसह अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान आणि १०८च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून पाण्याचा मारा करत आग विझविली. यावेळी बेडरूममधील सर्व वस्तू बेचिराख झालेल्या होत्या. तसेच मयूरदेखील आगीत मोठ्या प्रमाणात भाजल्याने मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. त्वरित मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून, मुंबईनाका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

----कोट----

रो-हाऊसमध्ये वरच्या बाजूला असलेल्या दोनपैकी एका बेडरूममध्ये आग लागली होती. या बेडरूमचा दरवाजा आतून कडी लावून बंद करण्यात आलेला होता. तसेच दरवाजाभोवती आतमधून पलंगदेखील लावलेला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संपूर्ण खोलीत आग पसरल्याने तरुणाला कुठेही सुरक्षित आश्रय घेता आला नाही, परिणामी तो होरपळून मृत्युमुखी पडला. तो बेरोजगार आणि अविवाहित होता. याप्रकरणी कुटुंबीयांचे जाबजबाब घेऊन पुढील चौकशी केली जात आहे.

- सुनील रोहकले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Web Title: Sunday became the ‘Fire’ War; Young Horplu kills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक