रविवार कारंजा मित्रमंडळाची रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:30 AM2017-08-26T00:30:00+5:302017-08-26T00:30:09+5:30
साधारणत: ९९ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला सुरुवात करणाºया रविवार कारंजा येथील रविवार कारंजा गणेश मित्रमंडळाचे शतकपूर्ती वर्ष सुरू झाले आहे. वेगवेगळ्या देखाव्यांसाठी प्रख्यात असलेल्या या मंडळाने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून खºया अर्थाने लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे.
नाशिक : साधारणत: ९९ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला सुरुवात करणाºया रविवार कारंजा येथील रविवार कारंजा गणेश मित्रमंडळाचे शतकपूर्ती वर्ष सुरू झाले आहे. वेगवेगळ्या देखाव्यांसाठी प्रख्यात असलेल्या या मंडळाने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून खºया अर्थाने लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. ९९ वर्षांपूर्वी गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई यांनी रविवार कारंजा येथे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा सुरू आहे. गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सामाजिक भान जपणाºया या मंडळाने वास्तवातही वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची धडाडी कायम ठेवली आहे. या मित्रमंडळाचा धमार्थ दवाखाना वर्षभर सुरू असतो. दिवसाकाठी शंभरहून अधिक रुग्ण या धमार्थ दवाखान्यात उपचार करतात. तसेच दुर्धर शस्त्रक्रियेसाठी या मंडळाने स्थापन केलेल्या ट्रस्टमार्फत हृदयविकार शस्त्रक्रिया (बायपास), मेंदू शस्त्रक्रिया (ब्रेनट्यूमर) आदींसह विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी चार ते पाच हजारांपर्यंत रक्कम रुग्णाच्या खात्यात जमा केली जाते. नैसर्गिक आपत्तीतही रविवार कारंजा मित्रमंडळ प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आपतग्रस्तांना मदत करते. दोन वर्षापूर्वी गोदावरीला आलेल्या पुरामुळे गंगावाडीतील रहिवाशांना तब्बल दोन दिवस भोजन व निवासाची व्यवस्था रविवार कारंजा मित्रमंडळाने गंगावाडीतीलच बालाजी मंदिरात करून दिली. तसेच जमलेल्या वर्गणीतून व दानातूनच हे सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितले.
दोनशे किलोचा चांदीचा गणपती
१९७८ साली रविवार कारंजा मित्रमंडळाने ११ किलो चांदीपासून गणपती बनविण्यास सुरुवात केली. साधारणत: १९८५-८६ मध्ये २०० किलोची चांदीच्या गणपतीची मूर्ती पूर्ण झाली. दोन वर्षांपूर्वी याच चांदीच्या गणपतीला एक किलो सोन्याचे अलंकार चढविण्यात आले आहेत. ही मूर्ती लोंढे बंंधूनी बनविली. त्यावर अंतिम हात बाळू संगमनेरकर यांनी फिरविला. चांदीच्या मूर्तीसाठी टकले बंधूंनी २०० किलो चांदी उपलब्ध करून दिल्यानंतर ४०० किलो चांदीतून २०० किलोची चांदीची गणेशमूर्ती साकारली आहेत.