रोटरीच्या अध्यक्षपदी सुनील देवरे, सचिवपदी खंडू मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 11:22 PM2021-07-18T23:22:46+5:302021-07-19T00:19:00+5:30
देवळा : रोटरीचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर चालते. सामाजिक योगदानातून घडत असलेल्या कामासोबत नूतन पदाधिकाऱ्यांनी शिक्षण, आरोग्य क्षेत्रात कार्य करून वेगळा ठसा उमटवावा, असे आवाहन विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी केले. येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊनच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाश महाले, उपप्रांतपाल बी. के. पाटील उपस्थित होते. रोटरीच्या माध्यमातून कसमादेच्या डाळिंब पीक विकासाला चालना द्यावी, असे प्रतिपादन सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील यांनी केले. यावेळी देवळा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाचा कार्यभार नूतन अध्यक्ष क्रीडाशिक्षक सुनील देवरे यांनी मावळते अध्यक्ष सतीश बच्छाव यांच्याकडून, तर सचिव खंडू मोरे यांनी सुनील देवरे यांच्याकडून स्वीकारला. कोरोना काळात योगदान दिल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गणेश कांबळे, डॉ. सुभाष मांडगे, डॉ. सुजित आहेर, उद्यान पंडित बाळासाहेब देवरे, विजय पगार, कलाशिक्षक भारत पवार, स्वामी पवार, आदींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. व्ही. एम. निकम, प्रा. सतीश ठाकरे, डॉ. वसंत आहेर, कौतिक पवार, सतीश बच्छाव, प्रीतेश ठक्कर, संदीप पगार, अरुण पवार, एस. टी. पाटील, संजीव आहेर, राकेश शिंदे, भारत गोसावी, रोशन अलीटकर, वैभव पवार, अक्षय निकम, विलास सोनजे, माणिक सोनजे उपस्थित होते.