सुनील खोडे वाहन तोडफोडीचे प्रमुख सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:39 AM2018-04-14T00:39:50+5:302018-04-14T00:39:50+5:30

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधील इंदिरानगरचे भाजपाचे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड ही भाजपाचे माजी नगसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती सुनील खोडे यांनीच घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ भाजपा नगरसेवकांतील अंतर्गत गटबाजी व विकासकामांच्या श्रेयवादातून हा प्रकार केल्याचे समोर आले

Sunil Khode, chief architect | सुनील खोडे वाहन तोडफोडीचे प्रमुख सूत्रधार

सुनील खोडे वाहन तोडफोडीचे प्रमुख सूत्रधार

googlenewsNext

इंदिरानगर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधील इंदिरानगरचे भाजपाचे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड ही भाजपाचे माजी नगसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती सुनील खोडे यांनीच घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ भाजपा नगरसेवकांतील अंतर्गत गटबाजी व विकासकामांच्या श्रेयवादातून हा प्रकार केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी शुक्रवारी (दि़ १३) सकाळी खोडे यांना अटक केली व त्वरित जामीनही मंजूर केला़ दरम्यान, खोडे यांची भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी नगरसेवक सोनवणे व कुलकर्णी यांनी केली आहे़  राजीवनगरमधील रहिवासी तथा प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या घराबाहेर उभी असलेल्या इनोव्हा कारचे (एमएच १५ डीवाय ६३६०) तसेच रथचक्र चौकातील साईश्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवासी नगरसेवक दीपाली कुलकर्णी याच्या वोक्सवॅगन वेन्टो (एमएच १५ ईएक्स ६६५५) कारचे गुरुवार, दि़ ५ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास चार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केले़ दोन दुचाकींवरून आलेल्या या चार समाजकंटकांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते तसेच त्यांच्या हातात लाकडी दांडके होते़ या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या समाजकंटकांचे कृत्य परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. फुटेजच्या तपासानंतर संशयित पांडवनगरी परिसरातील असल्याचे समोर आले होते. इंदिरानगर पोलिसांनी वाहन तोडफोडीतील संशयित ओमकार मैंद याच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले़ मात्र, त्यांचा म्होरक्या प्रीतम ऊर्फ डॅनी प्रकाश गोडसे (रा. पांडवनगरी) हा फरार होता़ त्यास बुधवारी (दि. ११) रात्री अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत भाजपाचेच माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी वाहनांची तोडफोड करण्यासाठी सांगितल्याचे पोलिसांना सांगितले़ पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी बाहेरगावी असल्याचे सांगितले़ मात्र शुक्रवारी (दि़ १३) सकाळी ८ वाजताच इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाले़
सोशल मीडियामध्येही खोडेंवर संशय
वाहनांच्या तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर त्यामध्ये संशयित प्रीतम गोडसे हा स्पष्टपणे वाहनांची तोडफोड करीत असल्याचे दिसत होते़ गोडसे हा नेहमी खोडे यांच्यासोबत राहत असल्याने त्यांनीच हा प्रकार घडवून आणला असावा असे मत व्यक्त होत होते़ दरम्यान, वाहनांचे नुकसान झालेल्या नगरसेवकांनीही मुख्य सूत्रधाराला पकडण्याची मागणी केली होती़ खोडे यांचा यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाने त्यांची हकालपट्टीची मागणी या दोघा नगरसेवकांनी केली आहे़

Web Title: Sunil Khode, chief architect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.