राजस्थानच्या सुनील कुमारने जिंकली मविप्र मॅरेथॉन ; सैन्यदलातील जवानांचे स्पर्धेत वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 08:54 PM2020-01-05T20:54:08+5:302020-01-05T20:56:15+5:30
सातव्या राष्ट्रीय व बाराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२० स्पर्धेत राजस्थानचा धावपटू तथा सैन्य दलातील जवान सुनील कुमार याने २ तास २८ मिनिटे २५ सेकंदांचा वेळ नोंदवत विजेतपद पटकावले. तर नागपूरचा देवेंद्र चिखलोंढे याने २ तास ३० मिनिटे ६ सेकंदाचा वेळ घेत द्वितीय व उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अंकुर नील कुमार याने २ तास ३० मिनिटे व ४२ सेकंदांचा वेळ घेत तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.
नाशिक : सातव्या राष्ट्रीय व बाराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२० स्पर्धेत राजस्थानचा धावपटू तथा सैन्य दलातील जवान सुनील कुमार याने २ तास २८ मिनिटे २५ सेकंदांचा वेळ नोंदवत विजेतपद पटकावले. तर नागपूरचा देवेंद्र चिखलोंढे याने २ तास ३० मिनिटे ६ सेकंदाचा वेळ घेत द्वितीय व उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अंकुर नील कुमार याने २ तास ३० मिनिटे व ४२ सेकंदांचा वेळ घेत तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.
विशेष म्हणजे यावर्षी पूर्ण मॅरेथॉनमधील पहिले तीनही धावपटू हे सैन्य दलातील जवान असून, अर्धमॅरेथॉनमध्ये १ तास ९ मिनिटे १२ सेकंद या वेळात प्रथम क्रमांक पटकावणारा गुरुजित सिंग हाही सैन्य दलातील जवान आहे. त्यामुळे यावर्षीच्या मविप्र मॅरेथॉनमध्ये सैन्य दलाच्या जवानांचेच वर्चस्व दिसून आले. २१ किमीच्या अर्धमॅरेथॉनमध्ये दिनकर महाले याने १ तास ९ मिनिटे २९ सेकं द तर दिनकर लिलके याने १ तास ११ मिनिटे १ सेकंदाची वेळ नोंदवत अनुक्रम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेतर्फे आयोजित मविप्र मॅरेथॉन २०२० स्पर्धेला रविवारी (दि.५) शहराचे तापमान १० अंशापर्यंत घसरल्याने बोचºया थंडीतही चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या एकूण १५ गटांमध्ये सुमारे ३ हजारांहून अधिक धावपटंूनी उत्साहात सहभाग नोंदवत मॅरेथॉनमध्ये धाव घेतली. पहाटेच्या गुलाबी थंडीत पावणे सहापासून ४२ किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनने स्पर्धेची सुरुवात झाली. यावर्षी स्पर्धेचे प्रमुख अतिथी असलेले आॅलिम्पिक हॉकी खेळाडू अजित लाक्रा यांच्यासह मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघो नाना अहिरे, संचालक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विश्राम निकम, प्रल्हाद गडाख, उत्तम भालेराव, दत्तात्रय पाटील, अशोक पवार, भाऊसाहेब खातळे, सचिन पिंगळे आदींच्या उपस्थितीत ४२.१९५ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंना हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर विविध १५ गटांसाठी वेगवेगळ्या अंतरासाठी सहभागी झालेल्या स्पर्धकांना सोडण्यात आले. स्पर्धेसाठी भारतातून उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, हरियाणा, दिल्ली, तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील धावपटू असे एकूण ३००० च्या वर स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी नाशिककरांसह मविप्रचे विद्यार्थी व पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने धावपटूंना मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कांराचेही सादरीकरण के ले. दरम्यान, या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा हॉकीपटू अजित लाक्रा व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात झाला. यावेळी धावपटूंना मार्गदर्शन करताना आॅलिम्पिक खेळाडू अजित लाक्रा यांनी यशस्वी खेळाडू होण्यासाठी प्रत्येकाने मनात जिद्द व चिकाटी ठेवण्याचे आवाहन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठे ध्येय निश्चित करून कोणत्याही कठीण परिस्थितीत खचून न जाता नियमित प्रयत्न करून योग्य प्रशिक्षकांच्या मदतीने क्रीडा क्षेत्रात यशाचे शिखर गाठता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांच्या अशा शिस्तबद्ध स्पर्धेच्या नियोजनामुळे नाशिकसारख्या शहरांमध्ये क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळत असून, क्रीडा क्षेत्रातील विविध क्षितिजे गाठण्यासाठी मविप्रसारख्या संस्थांनी खेळाडूंना पाठबळ देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.