सिन्नर वाचनालय संचालकपदी सुनील उगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:46+5:302021-06-09T04:16:46+5:30
---- वावी येथे सह्याद्री प्रतिष्ठानचे रक्तदान शिबिर सिन्नर : शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान, ग्रामविकास संघ व वावी ...
----
वावी येथे सह्याद्री प्रतिष्ठानचे रक्तदान शिबिर
सिन्नर : शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान, ग्रामविकास संघ व वावी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सह्याद्री प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नाशिक रक्तपेढीच्या सहकार्याने सुमारे ४६ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना काटे, माजी सरपंच विजय काटे, प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले, सह्याद्री प्रतिष्ठानचे साईनाथ सरोदे, विलास पठाडे, किशोर जाधव, आशिष माळवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.
-------------
एस.जी. स्कूलचा ‘एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम
सिन्नर : एस.जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागामध्ये पर्यावरण दिनानिमित्त ‘एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम राबविण्यात आला. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घराभोवती, शेताच्या बांधावर एक झाड लावून त्याचा फोटो वर्गशिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला. संस्थेचे सचिव राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बापू चतुर, गणेश सुके, सागर भालेराव, अमोल पवार आदी शिक्षकांनी उपक्रमाचे नियोजन केले.