सुनील वाघ खुनातील संशयितांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 11:47 PM2016-06-22T23:47:18+5:302016-06-23T00:02:57+5:30
सुनील वाघ खुनातील संशयितांना कोठडी
नाशिक : हनुमानवाडी कॉर्नरवर भेळभत्ता विक्री करणाऱ्या सुनील वाघ खून प्रकरणातील फरार संशयित कुंदन परदेशी व अजय बोरीसा या दोघांसह बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर गोळीबार करणारा अक्षय इंगळे यास पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि़ २१) रात्री अटक केली़ या तिघांनाही बुधवारी (दि़ २२) न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
संशयित कुंदन परदेशी (२४, दळवी चाळ, हनुमानवाडी, पंचवटी) व अजय जेठा बोरिसा (२५, चैतन्य सोसायटी, पंचवटी) याच्यासह त्याच्या साथीदारांनी २७ मे रोजी हनुमानवाडी कॉर्नरवरील भेळभत्ता विक्री करणारे हेमंत व सुनील वाघ या दोघांवर लाकडी दांडके व दगडाने हल्ला केला होता़ यामध्ये सुनील वाघचा मृत्यू झाला, तर हेमंत वाघ गंभीर जखमी झाला होता़ या घटनेनंतर परदेशी व बोरिसा फरार झाले होते़ अजूनही आठ संशयित फरार आहेत़ यातील मंगळवारी अटक करण्यात आलेले परदेशी व बोरिसा तसेच हनुमानवाडी येथील बांधकाम व्यावसायिक गायकवाड यांच्या घरासमोर गोळीबार करणारा संशयित अक्षय इंगळे या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते़ या तिघांनाही २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)