सटाणा उपनगराध्यक्षपदी सुनीता मोरकर बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 04:07 PM2020-07-30T16:07:42+5:302020-07-30T16:08:31+5:30
सटाणा : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या सुनिता मोरकर यांची बिनविरोध निवड झाली. गुरु वारी (दि.३०) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड प्रक्रि या पार पडली.
सटाणा : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या सुनिता मोरकर यांची बिनविरोध निवड झाली. गुरु वारी (दि.३०) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड प्रक्रि या पार पडली.
सोनाली बैताडे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रि या घेण्यात आली. तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर, मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. उपनगराध्यक्षपदासाठी सुनिता मोरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रि येला सुरु वात झाल्यानंतर अर्जांची छाननी, माघार आणि निकाल या पद्धतीने सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आले. मोरकर यांच्या अर्जासाठी भाजपा गटनेते महेश देवरे सुचक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नितीन सोनवणे अनुमोदक राहिले. त्यानंतर सुनिता मोरकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रि येसाठी राकेश खैरनार, दिनकर सोनवणे, संगीता देवरे, दीपक पाकळे, शमा मंसूरी, राहुल पाटील, सुवर्णा नंदाळे, बाळू बागुल, पुष्पा सूर्यवंशी, आरिफ शेख, निर्मला भदाणे, आशा भामरे, रूपाली सोनवणे, भारती सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, शमीम मुल्ला, मनोहर देवरे, डॉ. विद्या सोनवणे आदीउपस्थित होते.
चौकट....
सटाणा नगरपरिषदेत नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीची भाजपसोबत युती झाली आहे.याशिवाय गेल्या चार वर्षाच्या कारभारात राष्ट्रवादी व काँग्रेस या विरोधी पक्षांनाही समान न्याय व सहकार्याची भूमिका ठेवल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये एकोपा निर्माण झाला आहे. या बळावर शहरविकासासाठी मोलाचा हातभार लागताना वेळोवेळी झालेल्या निवड प्रक्रि याही बिनविरोध झाल्या आहेत.
लगेच नगराध्यक्षपदाचीही संधी..
सटाणा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुनिता मोरकर यांची बिनविरोध निवड झाली. बांधकाम व्यावसायिक नाना मोरकर यांच्या त्या पत्नी आहेत. दरम्यान वैयक्तिक कारणाने नगराध्यक्ष सुनील मोरे रजेवर गेल्याने गुरुवारी(दि.३०)दुपारी शहराच्या प्रभारी नगराध्यक्ष पदाची संधी मोरकर यांना प्राप्त झाली.