सूर्यप्रकाशामुळे कोरोनाविरुद्ध वाढू शकते प्रतिकारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 07:31 PM2020-05-09T19:31:10+5:302020-05-09T19:40:50+5:30

कोरोना आणि सूर्याचा काही संबंध आहे का? असे म्हटले जाते की, ज्या देशाला सूर्याचे आशीर्वाद अधिक आहेत, त्या ठिकाणी कोरोना अधिक पसरला नाही एवढेच नव्हे तर लक्षणे ही वाढली नाहीत. कोरोनाचा प्रसार हा अधिक प्रमाणात उत्तरेला ३० डिग्री एन लॅटीट्यूड्य. परंतु दक्षिणेकडील जगातील ठिकाणे कमी प्रमाणात दिसून आला याचा अर्थ काही संशोधकांनी दक्षिणेकडे सूर्याची प्रखरता अधिक आहे व दक्षिणेकडील लोकांची प्रतिकार क्षमता उत्तरेकडील व्यक्तींच्या तुलनेने अधिक असल्याचे दिसले आहे.

Sunlight can increase immunity against corona | सूर्यप्रकाशामुळे कोरोनाविरुद्ध वाढू शकते प्रतिकारशक्ती

सूर्यप्रकाशामुळे कोरोनाविरुद्ध वाढू शकते प्रतिकारशक्ती

Next
ठळक मुद्देकोराना टाळण्यासाी उपायशुध्द हवाही आवश्यक

कोरोना आणि सूर्याचा काही संबंध आहे का? असे म्हटले जाते की, ज्या देशाला सूर्याचे आशीर्वाद अधिक आहेत, त्या ठिकाणी कोरोना अधिक पसरला नाही एवढेच नव्हे तर लक्षणे ही वाढली नाहीत. कोरोनाचा प्रसार हा अधिक प्रमाणात उत्तरेला ३० डिग्री एन लॅटीट्यूड्य. परंतु दक्षिणेकडील जगातील ठिकाणे कमी प्रमाणात दिसून आला याचा अर्थ काही संशोधकांनी दक्षिणेकडे सूर्याची प्रखरता अधिक आहे व दक्षिणेकडील लोकांची प्रतिकार क्षमता उत्तरेकडील व्यक्तींच्या तुलनेने अधिक असल्याचे दिसले आहे.

ज्या देशामध्ये कोरोना अधिक प्रमाणात वाढला, झपाट्याने पसरला त्या ठिकाणचे तापमान कमी आणि सूर्य ही कमी हे दिसत आहे. म्हणजे लोकांनी आपली क्षमता वाढवण्यासाठी सूर्याची किरणे घ्यायला हवी. भारतीय संस्कृतीमध्ये कोवळ्या उन्हाची किरणे बाल, वृद्ध, गर्भिणी यांनी घ्यावी, असा शास्त्र निर्देश आहे. शास्त्रीयदृष्ट्या शरीरातील क्रि या उत्तम रहाव्या, हाडांची शक्ती वाढावी व प्रतिकार क्षमता, अस्थी व त्वचेच्या माध्यमातून वाढावी हाच आहे. कोरोनामध्ये घरात बसणे अनिवार्य आहे. परंतु मोकळी हवा घेणे आणि सूर्य किरणे घेणे हे आरोग्यदृष्ट्या उपयुक्त आहे असे जागतिक संघटनेनेही सांगितले आहे. बागकाम, गच्चीवर चालणे, आवारात चक्र ा मारणे, गॅलरीमध्ये खुर्ची टाकून उन्ह घेणे, या क्रि या प्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या आहेत. सूर्यकिरणे आपली प्रतिकार यंत्रणा उत्तेजित करतात म्हणून त्याचा वापर करावा. सूर्य चुलीवरील खाद्यपदार्थ हे वेगळ्या चवीचे असतातच पण त्यांना एक प्रकारची विशेष शुद्धी व प्रतिकार क्षमता वाढवण्याचा गुणधर्म असतो. सूर्यकिरणांमध्ये अनेक जीवनी, लहान कीटक, हवेतील अशुद्ध वायू नष्ट करण्याची क्षमता असते हे आधी सिद्धच झाले आहे. म्हणून ग्रहण असताना, चंद्राचा प्रकाश कमी असताना रोग पसरण्याची शक्यता असल्याने काळजी घेतली जाते. अनेकवेळा अनेक आजार पसरल्याची उद्धरणे आहेत.

शरीराबरोबर मनावर सूर्याचा परिणाम दिसतो सूर्यकिरणे आपल्या मनाला उत्तेजित करून आनंद देतात. आपल्या शरीरातील विविध उपयुक्त स्त्रावांना सुस्थितीत आणतात, सेरोटोनीनसारखे स्त्राव नियंत्रणात ठेवतात. आधुनिक शास्त्राच्या मते विटामिन-डी हे त्वचेमार्फत मिळून प्रतिकार क्षमता वाढण्याला मदत करतात. वृद्ध उतार वयातील व्यक्तींनी हे आवर्जून करावे. त्यांच्या शरीराला विटामिन-डीची गरजही अधिक असते. मोकळ्या हवेत कोरोनाचा प्रसार होत नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे, निरीक्षण आहे. गर्दीत, ज्याठिकाणी रु ग्ण आहेत. कोंदटपणा आहे अशी ठिकाणे धोक्याची मानली गेली आहेत. मात्र मोकळी हवा आरोग्यदायी ठरते. सायंकाळी, सकाळी गच्चीवर, प्रांगणात मोकळी स्वच्छ हवा घेता येते व ती १०० टक्केसुरक्षित आहे. सध्याच्या प्रदूषण अल्प असल्याने स्वच्छ वातावरणात हवा घेणे अधिक सुरक्षित व उपयुक्त आहे. सार्वजनिक ठिकाण मात्र टाळावी. कारण, अनेक व्यक्तींचा स्पर्श असलेल्या ठिकाणी आपला स्पर्श होण्याचा धोका संभवतो. कोंदट, गर्दीच्या ठिकाणी हा विषाणू अधिक कार्यरत होतो. त्याच्या प्रसाराच्या वेगावरून दिसते आहे, असे निरीक्षण परीक्षणे अभ्यासाने चीन व युरोपचे शास्त्रज्ञ म्हणतात. विशेष म्हणजे प्रतिकारक्षमता आणि विटामिन-सी यांचाजवळचा संबंध आहे, हेही यामुळे प्रकाशात आले आहे. विटामिन-सी असलेले द्रव्य ही आयुर्वेददृष्ट्या रसायन गणामध्ये येणारी आहेत. हे शास्त्र सिद्ध आहे.

आवळा या फळामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन-सी आढळते आणि आवळा हा रसायनांचा राजा म्हटला जातो. आयुष मंत्रालयाने आणि प्रधानमंत्र्यांनी च्यवनप्राशचा उल्लेख केला त्यातील मुख्य घटक आवळा आहे. आवळ्याचे विविध प्रकार भारतात केले जातात. अगदी आवळ्याच्या लोणच्यापासून, सुपारी, मुखवास ते सुवर्ण आवळ्यापर्यंत ! अगदी काही ठिकाणी आवळ्याचे पाणीदेखील घेतले जाते. आवळा रस घेण्याची प्रथा व सवय अनेकांची दिसून येते. हे घटक विषाणूला मारू शकत नाही परंतु शरीराची मारण्यासाठीच्या यंत्रणेला शक्ती देतात हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. आपली क्षमता वाढली म्हणजे प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते.

आवळ्यासोबत पपया, अननस, संत्री, किवी, कोकम, रताळे, जरदाळू, ओवा ही विटामिन-सी असलेली आहेत. विटामिन-ड, तर मासे, कडधान्य चीज व अंड्यामध्ये थोड्या प्रमाणात, हे तसे चरबीमध्ये वितळणारे असल्याने कमी पदार्थात नैसर्गिक असते. माश्यांच्या प्रकारामध्ये, प्राण्यांच्या हाडांमध्ये असते. भारतीय आहारामध्ये हे नैसर्गिक विषाणूशी लढणारे सैन्य अधिक प्रमाणात असतेच त्याचा योग्य वापर अधिक करणे गरजेचे आहे. वृद्धवयातील व्यक्तीने आपली क्षमता वाढण्यासाठी उपयोग करावा व लाभ ही कोरोनाशी दोन हाथ करण्याचा घ्यावा.
- वैद्य विक्र ांत जाधव



 

Web Title: Sunlight can increase immunity against corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.