एनआरसी विरोधात सुन्नी तन्जीमचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:44 PM2020-01-22T22:44:25+5:302020-01-23T00:17:30+5:30
नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायदा रद्द करावा या मागणीसाठी सुन्नी तन्जीम व महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मालेगाव : नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायदा रद्द करावा या मागणीसाठी सुन्नी तन्जीम व महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात एनआरसीच्या विषयावरून मोर्चे व आंदोलने केली जात आहेत. सुन्नी तन्जीमनेही बुधवारपासून येथील जुन्या आग्रा रोडवरील हुसेनशेठ कम्पाउण्डमध्ये महिलांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. चार दिवस हे आंदोलन केले जाणार आहे. २५ जानेवारीला या आंदोलनाचा समारोप होणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक रद्द करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलनात महेरून्नीसा अशपाक, आयेशा समसुद्दोहा, रजिया अमीर हुसेन, शाहीन अब्दूल कय्युम, प्रा. आयेशा, वंदना आहेर, माया आहेर, लता आहेर आदींसह महिला सहभागी झाल्या आहेत.