सुपल्याची मेट ग्रामस्थांचा तात्पुरत्या स्थलांतराला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:21+5:302021-07-31T04:15:21+5:30

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : रायगडमधील तळीये गावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या सुपल्याची ...

Supalachi Met villagers oppose temporary migration | सुपल्याची मेट ग्रामस्थांचा तात्पुरत्या स्थलांतराला विरोध

सुपल्याची मेट ग्रामस्थांचा तात्पुरत्या स्थलांतराला विरोध

googlenewsNext

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : रायगडमधील तळीये गावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या सुपल्याची मेट व इतर सात वाड्या यांचे पुनर्वसन करण्याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदार दीपक गिरासे यांच्यामार्फत रहिवाशांमध्ये चर्चा घडवून आणली आहे. यावेळी ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्थलांतराला विरोध केला आहे.

प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरण करावे का? असे, विचारले असता नागरिकांनी त्यास नकार दिला.

आजपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत, आमची शेती इथे आहे, अजून तरी आम्हाला काही धोका निर्माण झाला नाही, अजून तरी पुनर्वसन करण्याची गरज नसल्याचे भिकन बदादे, संतोष आचारी, पोलीस पाटील किसन झोले यांनी चर्चेत सांगितले.

यावर यापुढे या भागात उत्खनावर प्रशासन लक्ष ठेवून आहे, तुमचे योग्य जागी व तुमची शेती व व्यवसाय याबाबत योग्य तो विचार करून, तसेच रोजगाराच्या साधनेवर कुठलीही गदा येणार नाही याचा विचार करून पुनर्वसन होईल, याची शाश्वती प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ब्रह्मगिरीचे सीमांकन करण्याच्या प्रोसेसला सुरुवात झाली आहे. थोड्याच दिवसांत किल्ले ब्रह्मगिरीच्या सीमा निश्चित होतील, असे ते म्हणाले.

यावेळी तहसीलदारांनी अतिवृष्टीमुळे या भागात काही अनुचित प्रकार घडला, तर पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनी तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक रणदिवे, सहायक गटविकास अधिकारी एस.जी. पाठक, विस्तार अधिकारी बी.एस. पवार, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, तलाठी जोशी, ग्रामसेवक विलास पवार, सरपंच जगन झोले, भिकन बदादे, शंकर बदादे, हिरामण जाधव, हरी झोले, विष्णू बदादे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------------

आम्हाला काही त्रास नाही...

अजून तरी सुपल्याच्या मेटला धोका नसून आमची शेती, गुरे, वासरे, इथेच आहेत. तुम्ही आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कुठेही जरी नेले तरी आम्हाला दररोज इथेच यावे लागेल. आमचे सर्वच इथे आहे. ब्रह्मगिरीला भेट देणाऱ्या भाविकांमुळे आम्हाला रोजगार मिळत असतो, आमचा बारा महिने रोजगार बुडेल, पूर्वजांपासून आम्ही इथेच राहतो, आम्हाला काही त्रास नाही, ब्रह्मगिरीवरून दगड पडल्याच्या बातम्या येत आहेत. दगड पडला खरा; परंतु तो दगड पुढच्या बाजूने पडला, सुपल्याच्या मेटचा आणि त्यातील अंतर खूप आहे, आजपर्यंत सुपल्याच्या मेटमध्ये कुठलाही दगड पडलेला नाही. आम्हाला आता तरी पुनर्वसन करण्याची गरज नाही, इथे ब्रह्मगिरीकडे जे भाविक येतात त्यांच्यामुळे येथील नागरिकांना रोजगार मिळत आहे, अशा भावना सरपंच जगन झोले यांनी व्यक्त केली.

(३० वेळुंजे)

300721\30nsk_30_30072021_13.jpg

३० वेळूंजे

Web Title: Supalachi Met villagers oppose temporary migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.