त्र्यंबकच्या आधाराश्रमाची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 02:20 PM2021-05-11T14:20:10+5:302021-05-11T14:20:24+5:30
त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या वाढत्या उपद्व्यापामुळे सर्वत्र हाहाकार होत असताना नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर येथील ...
त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या वाढत्या उपद्व्यापामुळे सर्वत्र हाहाकार होत असताना नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर येथील आधार आश्रमात जाऊन पाहणी केली.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने दुपारहून साध्या वेशात जात त्रंबकेश्वर भागातील सुमारे तीस मुलींचे श्रीमती कारडा बाल सदन येथील डॉ.रत्नाकर पवार यांची भेट घेतली. यावेळी डॉ.पवार यांनी सचिन पाटील यांना विविध माहिती देत मुलींचे संगोपन आणि घेण्यात येणारी काळजी याबाबत विशेष माहिती दिली. त्यानंतर आधारतीर्थ आश्रम येथे सुमारे १३० मुलं आहेत. तेथील व्यवस्थापक त्र्यंबकराव गायकवाड यांच्याकडून कशा प्रकारे येथे काळजी घेतली जाते. आतापर्यंत एकही कोविड बाधित आढळून न आल्याने कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत माहिती घेतली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले,पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे उपस्थित होते.
----------------
पोलीसप्रमुख पाटील ज्यावेळी आश्रमात आले त्यावेळी कोणताही खाकीचा रुदबा जाणवला नाही.साध्या वेशात आणि सरकारी गाडी विना त्यांनी परिसराची पाहणी केली. मुलांची घेतली जाणारी काळजी बघता त्यांनी संस्थाचालकांचे विशेष कौतुक केले.
------------------
कोविडची परिस्थिती पाहता प्रत्येकाला त्यांच्या कुटुंबांचा सांभाळ महत्वाचा ठरू पाहत आहे. परंतु आधार आश्रमात राहणाऱ्या मुलांना देखील भावना आहेत. त्यामुळे अचानक भेट देत त्यांची विचारपूस केली. या ठिकाणी मुलांना कोरोना बाबत सूचित केलेली नियमावली तंतोतंत पाळताना दिसली, असेच आदर्श सर्वांनी कुटुंब म्हणून घ्यावे.
-सचिन पाटील, पोलीस अधीक्षक,नाशिक.