समान करप्रणाली उत्पन्नवाढीला पूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:21 AM2017-08-27T00:21:02+5:302017-08-27T00:21:08+5:30

समान करप्रणाली ही राष्टÑाच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरणारी असते. जीएसटी कायद्याची तरतूद भविष्याच्या दृष्टीने विचार केल्यास राष्टÑाच्या बळकटीसाठी अधिक प्रभावी ठरणारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स यांनी केले.

 Supplement to the same tax regime | समान करप्रणाली उत्पन्नवाढीला पूरक

समान करप्रणाली उत्पन्नवाढीला पूरक

Next

नाशिक : समान करप्रणाली ही राष्टÑाच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरणारी असते. जीएसटी कायद्याची तरतूद भविष्याच्या दृष्टीने विचार केल्यास राष्टÑाच्या बळकटीसाठी अधिक प्रभावी ठरणारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स यांनी केले. आगामी महिनाभराच्या अंतरावर जीएसटीसह प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर भरणा करण्याचा दिनांक समीप आला असून, या पार्श्वभूमीवर सनदी लेखापालांना नवी करप्रणाली, कायद्यातील काही बदल, तरतुदीविषयींची माहिती अद्ययावत व्हावी, या उद्देशाने वडाळारोडवरील इंडियन चार्टर्ड अकाउंटंट््स इन्स्टिट्यूटच्या (आयसीएआय) वतीने दोनदिवसीय प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२६) आयसीएआय भवन येथे या परिषदेचे उद्घाटन लाला फिलिप्स यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पश्चिम विभागीय उपाध्यक्ष सर्वेश जोशी, अध्यक्ष विकास हासे, सचिव रोहन आंधळे, विक्रांत कुलकर्णी, आर. एस. जाजू, उदयराज पटवर्धन, रणधीर गुजराथी आदी उपस्थित होते. दरम्यान, फिलिप्स म्हणाले, कर अंमलबजावणीपासून ते संकलनापर्यंत जीएसटी कायदा हा भारताच्या उभारणीत महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थव्यवस्थेत यामुळे सुधारणा होणार असून, त्याचा फायदा पायाभूत सुविधांसाठी होत असल्याचे दिसून येईल. सद्यस्थितीतील भारताचा जो कर भरणा होत आहे त्याचा दर कमी असला तरी तो भविष्यात वाढून अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. सकाळच्या सत्रात सनदी लेखापाल उदयराज पटवर्धन यांनी दिवाळखोर व्यवसाय आणि संधी व पद्धती यावर मार्गदर्शन केले. तसेच जय छेरा यांचे लेखापाल व्यवसाय, जगदीश पंजाबी यांचे निवडक स्थावर मालमत्ता आणि अन्य भांडवल, तर अखेरच्या सत्रात अशीश केडिया यांनी जीएसटीचा सेवा आणि उत्पादन क्षेत्रावर पडणारा प्रभाव या विषयावर व्याख्यान झाले.

Web Title:  Supplement to the same tax regime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.