येवल्यात ६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 09:58 PM2021-05-18T21:58:02+5:302021-05-19T00:55:11+5:30

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना प्राथमिक स्वरूपात ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून येवला उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय व लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी २० याप्रमाणे ६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिल्या आहेत.

Supply of 60 Oxygen Concentrators at Yeola | येवल्यात ६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा

येवल्यात ६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा

Next
ठळक मुद्देभुजबळ यांच्या स्थानिक विकास निधीतून मदत

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना प्राथमिक स्वरूपात ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून येवला उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय व लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी २० याप्रमाणे ६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिल्या आहेत.

कोरोनाबाधित रुग्णासाठी सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे उपकरण अतिशय प्रभावी ठरत आहे. या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे सध्या कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने आवश्यक असणारी ऑक्सिजनची काही प्रमाणात गरज भागविण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळे येवला उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय व लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांना याचा अधिक फायदा होणार आहे.

Web Title: Supply of 60 Oxygen Concentrators at Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.