‘पॉस’च्या कमी वापराला पुरवठा खात्याचे खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:44 AM2019-01-09T00:44:26+5:302019-01-09T00:45:09+5:30

नाशिक : गेल्या तीन महिन्यांत जेमतेम तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द व तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्यापुरतीच मर्यादित कारवाई करणाऱ्या पुरवठा खात्याच्या दुर्लक्षामुळेच जिल्ह्णातील रेशन दुकानदारांकडून ‘पॉस’ यंत्राद्वारे धान्य वाटप करण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, पुरवठा खात्याने अवलंबिलेल्या तांत्रिक प्रणालीतील दोषांचेही होत नसलेले निराकरण रेशन दुकानदारांच्या पथ्थ्यावर पडू लागले आहे. परिणामी आॅक्टोबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात आॅनलाइन धान्य वाटपात सुमारे वीस टक्क्याने तफावत निर्माण झाली आहे.

Supply of account to less use of 'Poisson' | ‘पॉस’च्या कमी वापराला पुरवठा खात्याचे खतपाणी

‘पॉस’च्या कमी वापराला पुरवठा खात्याचे खतपाणी

Next
ठळक मुद्देसर्व तहसीलदारांना दुकाने तपासण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक : गेल्या तीन महिन्यांत जेमतेम तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द व तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्यापुरतीच मर्यादित कारवाई करणाऱ्या पुरवठा खात्याच्या दुर्लक्षामुळेच जिल्ह्णातील रेशन दुकानदारांकडून ‘पॉस’ यंत्राद्वारे धान्य वाटप करण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, पुरवठा खात्याने अवलंबिलेल्या तांत्रिक प्रणालीतील दोषांचेही होत नसलेले निराकरण रेशन दुकानदारांच्या पथ्थ्यावर पडू लागले आहे. परिणामी आॅक्टोबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात आॅनलाइन धान्य वाटपात सुमारे वीस टक्क्याने तफावत निर्माण झाली आहे.
तथापि, रेशन दुकाने तपासणीची बाब नियमित कामकाजाचा भाग असून, यापूर्वी किती दुकाने तपासण्यात आली व त्यात काय निष्पन्न झाले हे गुलदस्त्यात आहे. त्यातही गंभीर दोष आढळलेल्या तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही पुरवठा विभागाने केली असता, त्यातील एका दुकानदाराने या कारवाईला अपर आयुक्तांकडे अपील करून आपल्या बाजूने निकाल लावून घेत, पुरवठा खात्याच्या कारवाईला ठेंगा दाखविला आहे तर अन्य तीन दुकानांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. तीन महिन्यांतील या कारवाईच्या पलीकडे पुरवठा खाते पुढे सरकलेले नाही. परिणामी दुकानदारांना चांगलेच फावले असून, त्यातूनच आॅनलाइन प्रणालीतील दोषाचे कारण पुढे करून दुकानदारांनी पुन्हा मॅन्युअली धान्य वाटप सुरू करून काळाबाजारासाठी आपला मार्ग प्रशस्त केला आहे. अजूनही जिल्ह्णातील शिधापत्रिकाधारकांचे आधारचे सिडिंग शंभर टक्के पूर्ण झालेले नाही, शिवाय ‘पॉस’ यंत्रावर कुटुंब प्रमुखाचे बोटाचे ठसे न उमटण्याचा तांत्रिक दोष कायम आहे. पॉस यंत्राची नादुरुस्ती, रेंज न मिळण्याच्या तक्रारी कायम असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकलेला नाही. अशा परिस्थितीत जिल्ह्णात पॉसद्वारे धान्य वाटप कमी झाल्याचा निष्कर्ष निघणे क्रमप्राप्त असून, तहसीलदारांच्या तपासणीतूनच खरे कारण पुढे येण्यास मदत होणार आहे. दुकाने तपासण्याचे आदेश जिल्ह्णातील चांदवड, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक शहर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या आठ तालुक्यांत आॅक्टोबर महिन्याच्या तुलनेत पॉस यंत्राच्या सहाय्याने नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात धान्याचे वाटप कमी झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, रेशन दुकानदारांकडून ‘गोलमाल’ करण्यासाठी पॉस यंत्राचा वापर न करता मॅन्युअली धान्य वाटपावर अधिक भर दिला जात असल्याचा ढोबळ निष्कर्ष पुरवठा खात्याने काढला असून, आता सर्व तहसीलदारांना दुकाने तपासण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Supply of account to less use of 'Poisson'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार