सिन्नरला रेमडेसिविरचा पुरवठा; रुग्णांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:24+5:302021-04-19T04:13:24+5:30
रेमडेसिविर पुरवठा अधिकारी आवळकंठे यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे यांची बैठक पार पडली. नगराध्यक्ष किरण डगळे शिवसेनेचे कार्यालयीन प्रमुख पिराजी ...
रेमडेसिविर पुरवठा अधिकारी आवळकंठे यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे यांची बैठक पार पडली. नगराध्यक्ष किरण डगळे शिवसेनेचे कार्यालयीन प्रमुख पिराजी पवार आदी यावेळी उपस्थित होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार गोडसे यांच्याशी रेमडेसिविरच्या पुरवठ्याबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. गंभीर परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यास प्रतिसाद देत खासदार गोडसे यांनी तातडीने रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याबाबत बैठक घेतली.
सिन्नर येथील सहा खासगी कोविड उपचार केंद्रासह उपजिल्हा रुग्णालय, इंडिया बुल्स सेंटर येथील रुग्णांसाठी रेमडेसिविरची गरज आहे. रेमडेसिविरची गरज असलेले रुग्ण, त्यासाठी केलेली मागणी व झालेला पुरवठा याबाबतची वस्तुस्थिती गोडसे यांनी आवळकंठे यांच्यासमोर ठेवली. नगराध्यक्ष किरण डगळे यांनी कोविड रुग्णांना तातडीने इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सांगितले. उपलब्ध साठ्यापैकी ३६ रेमडेसिविर लगेचच देण्यात आले. आणखी साठा उपलब्ध होताच सिन्नरला मागणीनुसार पुरवठा करण्याचे आश्वासन आवळकंठे यांनी बैठकीत दिले.
इंडिया बुल्स येथील कोविड सेंटर व सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयालाही रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे. रुग्णांना तातडीने इंजेक्शन मिळण्यासाठी सदरचा मागणीनुसार पुरवठा करावा, अशा सूचना खासदार गोडसे यांनी सौंदाणे यांना दिल्या. सिन्नरला रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने पाठवण्यात येतील, असे आश्वासन सौंदाणे यांनी यावेळी दिले.
ज्या रुग्णाला खरोखरच तातडीची गरज आहे. अशा रुग्णांना प्राधान्यक्रमाने इंजेक्शन देण्यात येणार आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातलगांची धावपळ होत होती. ज्यादा दर देऊनही ते उपलब्ध करता येत नव्हते. इंजेक्शन मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
फोटो - १८ सिन्नर ३
रेमडेसिविर पुरवठा अधिकारी आवळकंठे यांच्याशी चर्चा करताना खासदार हेमंत गोडसे. समवेत नगराध्यक्ष किरण डगळे, पिराजी पवार.
===Photopath===
180421\18nsk_24_18042021_13.jpg
===Caption===
रेमडेसिविर पुरवठा अधिकारी आवळकंठे यांच्याशी चर्चा करताना खासदार हेमंत गोडसे. समवेत नगराध्यक्ष किरण डगळे, पिराजी पवार.