शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:41 PM2020-07-23T21:41:35+5:302020-07-24T00:23:00+5:30

सिन्नर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात युरियाचा तुटवडा असून, तो मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असतानाच जीव मुठीत धरून शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे रहावे लागत आहे. जिल्हा स्तरावरूनच पुरवठ्याचे नियोजन फसल्याने ही स्थिती उद्भवली असून, त्याची चौकशी करावी व मुबलक प्रमाणात युरियाचा पुरवठा करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

Supply urea to farmers | शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा करा

शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा करा

Next

सिन्नर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात युरियाचा तुटवडा असून, तो मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असतानाच जीव मुठीत धरून शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे रहावे लागत आहे. जिल्हा स्तरावरूनच पुरवठ्याचे नियोजन फसल्याने ही स्थिती उद्भवली असून, त्याची चौकशी करावी व मुबलक प्रमाणात युरियाचा पुरवठा करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, तातू जगताप, संजय वारुळे, तुषार गडाख यांनी याबाबतचे निवेदन दिले. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, तालुका कृषी अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा पतिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी जिल्हा कृषी अधिकारी पडवळ यांच्याशी संपर्क साधून युरियाचा तातडीने पुरवठा करावा याबाबत चर्चा केली. समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन पडवळ यांनी त्यांना दिले.
गतवर्षी तालुक्यात १0 जुलैपर्यंत तीन हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला होता. यंदा केवळ १७०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. पंचायत समिती सदस्यांनी इफको कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता केवळ तीस मेट्रिक टन खत सिन्नरला दिल्याची माहिती दिली. जिल्हास्तरीय अधिकारी व कंपनीच्या अधिकाºयांची बैठक घेऊन समस्या तातडीने सोडवावी, युरिया पुरवठ्यातील गैरव्यवहार उघडकीस आणून दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Supply urea to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक