शेतकरी संपाला वकील संघाचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:41 AM2018-06-06T00:41:36+5:302018-06-06T00:41:36+5:30
सटाणा : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव द्यावा व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी १ जूनपासून सुरु असलेल्या देशव्यापी शेतकरी संपाला मंगळवारी (दि.५) येथील वकील संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. संपाला पाठिंबा म्हणून येत्या १० जूनला वकील संघाच्या वतीने सटाण्यात चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे यांनी दिली. याबाबत मंगळवारी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

शासनाच्या उदासीनतेमुळे आजही शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे मातीमोल भावाने शेतमाल विकावा लागत आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. देशाचे कृषी मंत्री तर हा स्टंट असल्याचे सांगून शेतकºयांच्या मागण्यांचा विचार न करता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र तीही फसवीच त्याचा अतिशय कमी शेतकºयांना लाभ झाला, असेही निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका कॉँग्रेस सत्तेवर असताना शेतकºयांच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली. मोदींनी याकडे लक्षवेधून आम्हाला सत्ता दिल्यास कर्जमाफी बरोबरच शेतकºयांचा मालाला रास्त भाव मिळाला म्हणून तत्काळ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करून असे सांगितले होते. मात्र मोदी सरकार तर शेतकºयांच्या प्रश्नावर बोलायलाच तयार नाही . अशा नाकर्त्या सरकारला जागे करण्यासाठी येत्या १० जूनला शेतकºयांच्या संपात सहभागी होऊन चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा वकील संघाचे अध्यक्ष भदाणे यांनी दिला आहे. आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी वकील संघाचे सदस्य प्रकाश गोसावी, यशवंत सोनवणे, संजय अहीरे , मधुकर सावंत, रवींद्र पाटील, वसंतराव सोनवणे, निलेश डांगरे, सोमदत्त मुंजवाडकर, रेखा शिंदे, मनीषा ठाकूर आदी उपस्थित होते.