चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात विणकरांसाठी सहयोग शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:57 PM2018-02-27T23:57:13+5:302018-02-27T23:57:13+5:30
येवला : पैठणीच्या गुणवत्तेसह विणकरांचे जीवनमान उंचावे या हेतूने शहरातील पैठणी विणकरांसाठी येथील चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात पैठणी हस्तकला सहकार्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पैठणी विणकर दिगंबरसा भांडगे, भाजपाचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला सुरु वात करण्यात आली. इग्नूच्या विभागीय संचालक एस. सौनंद, राष्ट्रीय हातमाग विकास वरिष्ठ अधिकारी उपेंद्र बहिरे, भारत विमा निगमचे अधिकारी रवींद्र कानपूरकर, टेक्सटाइल इन्स्पेक्टर गजानन पात्रे, मास्टर प्रिंटर नामदेव शेटे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते ललित भांडगे, दत्ता हंडी, रमेशसिंग परदेशी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, तालुकाध्यक्ष राजूसिंग परदेशी, पैठणी उद्योजक मनोज दिवटे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाचे सहायक व्यवस्थापक पी. एल. सिंघल यांनी प्रास्ताविक केले. हातमाग विकास महामंडळाच्या वतीने उपस्थित अधिकारी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डी. जी. महाले यांनी सूत्रसंचालन केले.