पीकविम्यासाठी आधार कार्ड सक्तीचे

By admin | Published: June 27, 2017 01:22 AM2017-06-27T01:22:27+5:302017-06-27T01:22:39+5:30

नाशिक : वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्याबाबत न्यायालयात वाद सुरू असताना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले

Support cards for pervasive release | पीकविम्यासाठी आधार कार्ड सक्तीचे

पीकविम्यासाठी आधार कार्ड सक्तीचे

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्याबाबत न्यायालयात वाद सुरू असताना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी ज्या बॅँक खात्याशी आधार कार्ड जोडले असेल त्याच बॅँकेचा खाते क्रमांक त्यासाठी देणे बंधनकारक आहे.  केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांसाठी खरीप हंगामासाठी पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या विमा योजनेत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसानभरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसानभरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक, नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना पीक संरक्षण मिळणार आहे. या योजनेंतर्गत भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३९ हजार रुपये प्रतिहेक्टर असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी ७८० रुपये पीक विम्याचा हप्ता भरावयाचा आहे. खरीप ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम २४ हजार रुपये तर त्यासाठी ४८० रुपये विमा हप्ता, बाजरी कारळे आणि नाचणीसाठी २० हजार रुपये आणि विमा हप्ता ४०० रुपये आहे. मक्यासाठी २५ हजार रुपये आणि विमा हप्ता ५०० रुपये, मूग आणि उडीदसाठी १८ हजार रुपये तर विमा हप्ता ३६० रुपये, भुईमूगसाठी ३० हजार रुपये विमा हप्ता ६०० रुपये, सोयाबीनसाठी ४० हजार रुपये तर विमा हप्ता ८०० रुपये, कापूस ४० हजार रुपये तर विमा हप्ता दोन हजार तसेच कांदा पिकासाठी ५५ हजार रुपये प्रतिहेक्टर २७५० रुपये विमा हप्ता आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी छायाचित्र, बॅँक खातेपुस्तकाची प्रत आणि आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक असून, आधार कार्ड नसल्यास आधार कार्ड नोंदणी पावतीसह ओळखपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title: Support cards for pervasive release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.