शिवसेनेच्या अधिवेशनात मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा
By दिनेश पाठक | Updated: January 23, 2024 14:09 IST2024-01-23T14:09:02+5:302024-01-23T14:09:43+5:30
आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे सांगत यामुळे राज्यातील वातावरण बिघडत आहे.

शिवसेनेच्या अधिवेशनात मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा
दिनेश पाठक, नाशिक: येथील राज्य अधिवेशनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तीन प्रमुख ठराव पारित केले. त्यात पहिला ठराव मुंबईला महाराष्ट्रापासून कदापी तुटू देणार नाही यासाठी प्रयत्न करणे. दुसरा ठराव आरक्षणासंदर्भातील आहे. आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे सांगत यामुळे राज्यातील वातावरण बिघडत आहे.
राज्य शासन कोणत्याही समाजाला न्याय देऊ शकत नाही अशा स्थितीमध्ये मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला अथवा आंदोलनाला शिवसेनेचा (उबाठा) पाठिंबा परंतु इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का लागणार नाही यासाठी काळजी घेणे तसेच तिसरा ठराव हा कामगार तसेच शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात पारित झाला. सरकारने आणलेल्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणास विरोध दर्शविण्यात आला. हे कायदे अमलात आणू नये, राज्य शासन कर्मचारी वर्गात कंत्राटी भरती करू नये अशी मागणी अधिवेशनात तिसऱ्या ठरावाद्वारे करण्यात आली.