सर्व्हरअभावी आधार जोडणी ठप्प रेशनदुकानदारांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 06:03 PM2019-03-04T18:03:12+5:302019-03-04T18:05:19+5:30
खमताणे : रेशनचे धान्य बायोमेट्रिक पध्दतीने वाटपासाठी रेशनकार्डधारकांकडुन आधार लिकिंग करण्याचे काम गतीने सुरू असताना सर्व्हर डानमुळे हे काम थंडावले आहे. त्यामुळे नवीन अर्जाची डाटा एंट्री ठप्प झाली आहे. तसेच धान्य वितरणाची प्रकिया आॅनलाईन असल्याने अनेक लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
खमताणे : रेशनचे धान्य बायोमेट्रिक पध्दतीने वाटपासाठी रेशनकार्डधारकांकडुन आधार लिकिंग करण्याचे काम गतीने सुरू असताना सर्व्हर डानमुळे हे काम थंडावले आहे. त्यामुळे नवीन अर्जाची डाटा एंट्री ठप्प झाली आहे. तसेच धान्य वितरणाची प्रकिया आॅनलाईन असल्याने अनेक लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत गरीब कुटुंबांना रेशनवर सवलतीच्या कुटुंबाना रेशनवर सवलतीच्या दरात धान्य देण्यात येत आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीत रेशिनंगचे कॉम्युटरायझेशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेशनवरील धान्य वाटपाचे संपूर्ण कम्प्युटरायंझेशन करण्यासाठी राज्य सरकारने पावले टाकली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेशन धान्य वितरणासाठी बायोमेट्रिक पध्दत अवलंबण्यात येत आहे. बायोमेट्रिक धान्य वाटपामुळे धान्याची वीस टक्के गळती कमी होण्यास मदत होणार आहे. रेशनकार्ड धारक लाभार्थ्यांना बायोमेट्रिक ओळख पडल्यानंतर धान्य वितरित होणार आहे. बोगस शिधा पत्रिकाधारकांना आळा घालण्यासाठी प्रत्येक सदस्याचे आधार लिकिंग करण्यात येत आहे. मात्र नाव लिकिंग करता शासनाची आर सी एम एस म्हणजेच रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टीम हे संकेतस्थळ सध्या सर्व्हर अभावी बंद आहे. त्यामुळे शिधा पत्रिकाधारकाचे नाव समाविष्ट करणे ही कामे ठप्प आहेत.
लाभार्थी धान्यापासून वंचित
शिधा पत्रिकाधारकांना धान्य देताना त्याचा अंगठ्याचा ठसा धान्य वितरित केले जाते. याकरता त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड ची लिंक करण्यात आले आहे. मात्र सर्व्हर ठप्प असल्याने लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. मात्र ही सर्व प्रकिया आॅनलाईन असल्याने रेशन दुकानदारांनीही हतबलता व्यक्त केली आहे.
गत चार ते पाच दिवसांपासून सर्व्हरच्या समस्येमुळे आॅनलाईन डाटा एंट्रीचे काम ठप्प झाले आहे. ही समस्या संपूर्ण राज्यात आहे.
- श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुरवठा अधिकारी.
रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू केला. परंतु वारंवार सर्व्हर ठप्प होत असल्याने त्याचा सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागत आहे.
- वैभव बागुल, खमताणे. (फोटो ०४ बायोमेट्रीक)