मोबाइल रिटेलर असोसिएशनचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 10:50 PM2020-01-08T22:50:48+5:302020-01-08T22:51:07+5:30

अनधिकृत व्यवहार करणाऱ्या आॅनलाइन कंपनींवर कारवाई करण्यात यावी यासाठी आॅल इंडिया मोबाइल असोसिएशनने पुकारलेल्या बंदला देवळा शहर मोबाइल रिटेलर असोसिएशनने पाठिंबा दिला. यावेळी तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना निवेदन देण्यात आले.

Support of the Mobile Retailers Association | मोबाइल रिटेलर असोसिएशनचा पाठिंबा

मोबाइल रिटेलर असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देताना सतीश सावळा, अजय अहिरे, संदीप पाठक, योगेश सोनवणे, सतीश आहेर आदी.

Next

देवळा : अनधिकृत व्यवहार करणाऱ्या आॅनलाइन कंपनींवर कारवाई करण्यात यावी यासाठी आॅल इंडिया मोबाइल असोसिएशनने पुकारलेल्या बंदला देवळा शहर मोबाइल रिटेलर असोसिएशनने पाठिंबा दिला. यावेळी तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना निवेदन देण्यात आले.
आॅनलाइन खरेदी प्रणालीचा फटका, स्थानिक व्यापाऱ्यांना बसत असल्याने आॅनलाइन खरेदी - विक्री करणाºया ई-कॉमर्स कंपन्यांना विरोध करण्यासाठी व त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. देवळा शहरातील सर्व मोबाइल विक्रेत्यांनी आपले व्यवसाय दिवसभर बंद ठेवून आॅनलाइन कंपन्यांचा निषेध करत आपला पाठिंबा दिला. आॅनलाइन कंपन्या या भारतात आपला व्यवसाय करीत आहेत. परंतु हा व्यवसाय करीत असताना ते एफडीआय कायद्याचे पूर्णत: पालन करत नाहीत, स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. याबाबत गेल्या काही वर्षांपासून आॅल इंडिला मोबाइल रिटेलर असोसिएशनने याबाबत एक चळवळ उभी केली आहे. आणि त्याच अनुषंगाने दिल्ली येथे रामलीला मैदानावर बुधवारी झालेल्या आंदोलनास देवळा मोबाइल रिटेलर असोसिएशनने पाठिंबा दिला असून, आॅनलाइन कंपनींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश सावळा, विवेक दशपुते, अक्रम तांबोळी, तुषार खैरनार, सुनील बुरड आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Support of the Mobile Retailers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप