पुणतांब्याच्या आंदोलनास खानगावमध्ये पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:39 AM2019-02-10T00:39:05+5:302019-02-10T00:39:17+5:30
पुणतांबा येथे सुरू असलेल्या किसान क्रांती मोर्चाच्या आंदोलनासाठी अन्नत्याग करणाऱ्या कृषिकन्यांना येथील शेतकºयांनी पाठिंबा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
वनसगाव : पुणतांबा येथे सुरू असलेल्या किसान क्रांती मोर्चाच्या आंदोलनासाठी अन्नत्याग करणाऱ्या कृषिकन्यांना येथील शेतकºयांनी पाठिंबा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता निफाड तालुक्यातील खानगाव येथे कृषिकन्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकºयांची बैठक झाली. बैठकीचे रूपांतर नंतर सभेत झाले. या सभेत शेतकºयांनी पुणतांबा येथील आंदोलनास पाठिंबा देत मागण्या मान्य न झाल्यास गावोगाव सरकार विरोधात आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा दिला. किसान
क्रांतीच्या आंदोलनाला शेतकरी कन्यांनी अन्नत्याग आंदोलन करून पाठिंबा दिला आहे. या सभेत संदीप गारे, विकास रायते, बापू गारे, मंगेश रकिबे, संदीप रायते, विकास गारे, राकेश रायते, दिगंबर गारे, अण्णा कापङी, संतोष शिंदे, केशव शिंदे आदी उपस्थित होते.