शिवसेना कांदे यांच्या पाठीशी, राष्ट्रवादी गेली कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 01:46 AM2021-10-01T01:46:26+5:302021-10-01T01:47:01+5:30
-हा भुजबळ विरूध्द शिवसेना असा वाद नाही असे राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ सांगत असले तरी गुरूवारी (दि. ३०) मात्र शिवसेनेचे पदाधिकारी सुहास कांदे यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे चित्र गुरूवारी दिसले आहे. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परीषदेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकरांपासून सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होतेच, शिवाय करंजकर यांनी कांदे यांचे समर्थन केले. एकीकडे सेना पाठीशी असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी गेली कुठे असाही प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.
नाशिक-हा भुजबळ विरूध्द शिवसेना असा वाद नाही असे राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ सांगत असले तरी गुरूवारी (दि. ३०) मात्र शिवसेनेचे पदाधिकारी सुहास कांदे यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे चित्र गुरूवारी दिसले आहे. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परीषदेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकरांपासून सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होतेच, शिवाय करंजकर यांनी कांदे यांचे समर्थन केले. एकीकडे सेना पाठीशी असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी गेली कुठे असाही प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.
नांदगाव मतदार संघात पुरसेा निधी मिळाला नाही आणि पालकमंत्री भुजबळ पक्षापात करतात असा आरोप करीत आमदार सुहास कांदे यांनी पंधरवाड्यातच त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर तो मिटला. त्यानंतर पुन्हा उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या विरोधात याचिका दाखल करून त्यांना पालकमंत्री पदावरून दूर करावे अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ आणि सुहास कांदे या दोन लोकप्रतिनधींमधील वाद दिसत होता. नांदगाव मतदार संघातून कांदे यांनी पंकज भुजबळ यांना पराभूत केल्याने त्याचा एक कंगोरा सांगितला जात होता. मात्र, स्थानिक पातळीवरील हे मर्यादीत राजकारण असताना गुरूवारी मात्र, शिवसेनेच्या पाठबळामुळे त्याला वेगळेच परीमाण प्राप्त झाले आहे. त्यातच कांदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याच्या जुन्या घटनेच्या फेाडणी दिल्याने पदाधिकाऱ्यांचे ते पथ्यावरच पडले आहे.
शासकीय विश्रामगृहावर आयोजित आमदार सुहास कांदे यांच्या पत्रकार परीषदेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर तसेच माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड आणि महापालिकेतील गटनेते विलास शिंदे देखील उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना पक्ष म्हणुून कांदे यांच्या पाठीशी असल्याचे दिसले. इतकेच नव्हे तर शिवसैनिकांवर जर अन्याय होत असेल तर त्याच्या पाठीशी राहणारच असल्याचे विजय करंजकर यांनी स्पष्ट केले.
इन्फो...
हा वाद सेना - भुजबळ असा नाहीच..
भुजबळ यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्या विरोधात शिवसेना एकवटली असताना भुजबळ यांनी मात्र हा शिवसेना विरूध्द भुजबळ असा वाद असल्याचा इन्कार केला. पदाधिकारी उपस्थित असले म्हणजे समर्थन नसते. माझ्या पत्रकार परीषदेलाही शहराध्यक्ष- जिल्हाध्यक्ष उपस्थित असतात, याचा अर्थ पक्षीय समर्थन असते असे नाही.
इन्फो..
राष्ट्रवादी गेली कुठे?
एकीकडे शिवसेनेच्या वतीने भुजबळ यांचे समर्थन केले जात असताना दुसरीकड राष्ट्रवादी मात्र गेली कुठे अशीही चर्चा हेात आहे. भुजबळ यांच्यावरील समर्थन प्रसंगी जल्लोष, फटाके वाजवणारे कार्यकत्य'ांचे तटस्थ राहाणे हा चर्चेचा विषय ठरला.
.इन्फो.....
बालक पालक आणि गुलाबराव पाटील यांचा सल्ला
नाशिक दौऱ्यावर आलेले राज्याचे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बालकांनी पालकाप्रमाणे वागू नये तसेच पालकांप्रमाणे वागू नये असा सल्ला दिल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. भुजबळ यांनी हे परीपक्व विधान असल्याचे सांगताना घरातील वाद बाहेर नको असे मत व्यक्त केले.