‘पवार बंगलोज्’ बाहेर समर्थकांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:15+5:302021-07-08T04:12:15+5:30

चौकट=== आदिवासी, कृषी खाते मिळावे डॉ. भारती पवार यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याचा खूप आनंद झाला. पहिल्यांदा साहेब (स्व. ए.टी.पवार) ...

Supporters cheer outside 'Pawar Bungalows' | ‘पवार बंगलोज्’ बाहेर समर्थकांचा जल्लोष

‘पवार बंगलोज्’ बाहेर समर्थकांचा जल्लोष

Next

चौकट===

आदिवासी, कृषी खाते मिळावे

डॉ. भारती पवार यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याचा खूप आनंद झाला. पहिल्यांदा साहेब (स्व. ए.टी.पवार) मंत्री झाल्याचा आनंद झाला तसाच आनंद झाला आहे. कोणत्याही खात्याचा सक्षमपणे ती कारभार सांभाळू शकते. त्यातल्या त्यात आदिवासी किंवा कृषी खाते मिळाले तर भारती चांगले काम करू शकते.

- शकुंतला पवार, सासू

-----

चौकट====

आईने केला सांभाळ

डॉ. भारती पवार यांचे जन्मगाव कळवण तालुक्यातील नरुळ येथील असले तरी वडील किसनराव बागूल हे कल्याणला रेल्वे खात्यात चांगल्या पदावर कार्यरत होते. मात्र डॉ. भारती या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आईनेच मोठ्या कष्टाने त्यांचे संगोपन व शिक्षण केले. डॉ. पवार यांना एक भाऊ असून, ते मुंबईतच ओएनजीसीमध्ये अभियंते म्हणून कार्यरत आहेत. तर आई मूळ नरूळ या गावी आहेत.

(फोटो डेस्कॅनवर आहेत)

Web Title: Supporters cheer outside 'Pawar Bungalows'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.