प्रचंड उष्णतेने पिकांनी टाकल्या माना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 10:34 PM2021-07-08T22:34:04+5:302021-07-09T00:36:23+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात पावसाळी वातावरण असतानासुद्धा सूर्यदेवता दिवसेंदिवस उष्णतेची आग ओकत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात पावसाळी वातावरण असतानासुद्धा सूर्यदेवता दिवसेंदिवस उष्णतेची आग ओकत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे.
आकाशात काळ्या ढगांचा समूह आता पाऊस पाडेल, अशी परिस्थिती निर्माण होत असताना गुरुवारी (दि.८) सकाळपासून सूर्यदेवता उष्णता वाढवीत असल्याने खरीप पिकांनी प्रचंड तापमानमुळे माना टाकल्या आहेत.
यंदा खरीप हंगामाचे बदलत्या हवामानामुळे सर्व गणित चुकले आहे. हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण मागील वर्षापेक्षा जास्त राहील, असे भाकीत वर्तविले होते. परंतु पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने बळीराजांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.
मागील वर्षी यावेळी पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. परंतु यंदा मात्र त्याने डोळे वटारले आहेत. त्यामुळे खरीप हंगामाचे आता काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आठवड्यातील तापमान
१ जुलै - २७.००डिग्री
२ जुलै - २९.००डिग्री
३ जुलै - २७.००डिग्री
४ जुलै - २९.००डिग्री
५ जुलै- २८.००डिग्री
६ जुलै :- २९.००डिग्री
७ जुलै :- ३०.००डिग्री
८ जुलै :- ३०.००डिग्री