निम्म्याहून अधिक दुकाने खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:45 PM2020-05-09T22:45:49+5:302020-05-10T00:45:52+5:30
नाशिक : गेल्या सुमारे दीड महिन्यांपासून दुकाने आणि व्यवहार बंद आहेत आता शासकीय नियमांचा कितीही सावळा गोेंधळ झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून शहराच्या विविध भागांत दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे शनिवारी (दि.९) शहराच्या विविध भागांत वाहनांची वर्दळदेखील वाढल्याचे दिसून आले.

नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली तरी पोलिसांनी परवानगी आहे काय? असे विचारात दुकाने बंद केल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अनेक व्यापारी संघटनांनी १७ मेपर्यंत दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागांत दुकाने उघडण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक आणि अन्य काही नियमांत बसणारी दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी आता मात्र सर्वच प्रकारच्या विक्री आणि सेवेची दुकाने सुरू झाल्याचे दिसत आहेत. शालिमार येथील तर सर्व कपड्यांची दुकाने सुरू झाली असून, याशिवाय अन्य ठिकाणीही गॅरेज, मोटारीचे सुटे भाग, कार डेकोेर, फर्निचर, लॉँड्री, गिफ्ट आर्टिकल, प्लायवुड, सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी,आइस्क्रिम, हार्डवेअर अशी दुकाने सुरू झाली आहेत. अनेक व्यावसायिकांची आॅफिसेसदेखील सुरू झाल्याने शहरात आता पूर्वीप्रमाणेच गर्दी दिसत आहे.
--
मग अन्य वस्तूंचे काय?
शहरातील मद्यविक्रीची दुकानेखुली करण्यास परवानगी मिळते, मग इतरांना का नाही असा प्रामुख्याने व्यापारीवर्गाचा प्रश्न होता. त्यामुळे अनेकांनी आता नुकसान टाळण्यासाठी सर्रास दुकाने सुरू केली आहेत.