तोफखाना केंद्र विद्यालयात ‘सुरबहार’ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 04:46 PM2020-01-23T16:46:50+5:302020-01-23T16:51:03+5:30
भारतीय शास्त्रीय संगीत कला व संस्कृती या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘स्पिक मॅके’ या संस्थेच्या वतीने देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये संगीत कार्यक्र माचे आयोजन केले जात आहे.
नाशिक : भारतीय शास्त्रीय संगीत कला व संस्कृती या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘स्पिक मॅके’ या संस्थेच्या वतीने देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये संगीत कार्यक्र माचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेअंतर्गत नाशिक रोड कॅम्पच्या तोफखाना केंद्र येथील केंद्रीय विद्यालयात प्रसिद्ध वादक पं. पुष्पराज कोष्टी यांच्या सुमधुर ‘सूरबहार’ हा वादनाचा कार्यक्र म संपन्न झाला. संथ आलापीने सुरु वात करून राग भूपाल तोडी मधील द्रुतलयीतील तालबद्ध रचना सादर करून कोष्टी यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान पंडितजींनी सुरबहार या वाद्याची विद्यार्थ्यांना दिली. त्यांना विवेकानंद कुरंगले यांनी पखवाज वाद्यावर साथसंगत केली. सुरु वातीला प्राचार्य देवेंद्रकुमार ओलावत यांनी कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपप्राचार्या अंजू कृष्णानी, तुषार वारडे, महादेव बारब्दे, महेंद्र महाजन, गुलाम उस्मानी, शोभा पाटील, सुनील वाघ, दिनेश सोनार, पिंटू टाक आदी, मनोज समुद्र आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आरिफ बेग यांनी केले तर आभार प्रदर्शन आरती कुमारी हिने केले.